Monday, 2 January 2023

एन. जी. वर्तक इंग्रजी माध्यम हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न !

एन. जी. वर्तक इंग्रजी माध्यम हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न !

वसई / पालघर : दि.०२ (प्रतिनिधी) विरार पूर्व येथील आगाशी-विरार-अर्नाळा शिक्षण संस्था संचलित एन. जी. वर्तक इंग्रजी माध्यम शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.
     स्नेहसंमेलनास मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाच्या लोककला विभागाचे प्रमुख तथा प्राध्यापक डॉ. गणेश चंदनशिवे, शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सारिका रावत,  पद्मश्री भाऊसाहेब वर्तक पदवी महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका डॉ. शितल कोरडकर, श्रीमती तारामाई वर्तक मेमोरियल अकॅडमीच्या मुख्याध्यापिका श्रीमती रचना शर्मा, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती रंजना कोळवणकर तसेच शाळेच्या माध्यमिक व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका श्रीमती संगीता डिसिल्वा व श्रीमती मनीषा अडेलकर उपस्थित होत्या.
     विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा व भारतीय तसेच विदेशी शास्त्रज्ञांची माहिती व्हावी या उदात्त हेतूने संस्थेचे अध्यक्ष  विकास वर्तक यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'भित्ती उत्तीत शिल्पाचा' अनावरण सोहळा पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला. यानंतर 'एन.जी.वी. एक्सप्रेस' या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी नाटिकेद्वारे वार्षिक अहवाल, नृत्य गायन, मुक अभिनय असे विविध कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. गतवर्षी दहावीच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार, शालेय-आंतरशालेय कला-क्रीडा महोत्सवात यश मिळविलेल्या तसेच जिल्हा व राज्यस्तरावर विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी व शिक्षकांचा यथोचित सन्मान यावेळी करण्यात आला. सदर वार्षिक स्नेहसंमेलनासाठी व्यवस्थापन मंडळाचे विशेष सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! घाटकोपर, ...