लांजा एस.टी स्थानकमध्ये एस.टी प्रवाशांच्या सोयीसाठी असणाऱ्या प्रसाधन गृहाची दुरवस्था !
'कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा लांजा'च्या वतीने लांजा 'एस.टी स्थानक व्यवस्थापक' यांना निवेदन
मुंबई उपनगर, (शांताराम गुडेकर) :
लांजा बस स्थानक मध्ये एसटी प्रवाशांच्या सोयीसाठी असणाऱ्या प्रसाधन गृहाची दुरवस्था लवकरात लवकर दूर करून ते वापरण्यायोग्य करावे यासाठी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा लांजाच्यावतीने लांजा बस स्थानक व्यवस्थापक यांना दि. ३१ जानेवारी २०२३ रोजी निवेदन देण्यात आले.
यावेळी लांजा बस स्थानक व्यवस्थापक यांनी या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत लवकरच या प्रसाधन गृहाची आवश्यक ती डागडुजी करून ते व्यवस्थित स्वच्छ, वापरण्यायोग्य करण्यात येईल असे सकारात्मक आणि जबाबदारी पूर्वक आश्वासन दिले. या प्रसंगी लांजा शाखा उपाध्यक्ष श्री.सुभाष पालकर ,विलास आग्रे, विनेश बाणे इत्यादी समाजबांधव उपस्थित होते. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा लांजाचे समस्त पदाधिकारी, सभासद, समाज बांधव यांनी समस्या लक्षात घेऊन निवेदन दिल्याबद्दल स्थानिक नागरिक, प्रवाशी यांनी यनिमित्ताने कु.स.संघ मुंबई शाखा लांजा चे आभार व्यक्त केले आहेत.
No comments:
Post a Comment