Wednesday, 1 February 2023

चोपडा रोटरी तर्फे भारतातील पहिल्या पर्यावरण पूरक ई बाईक रॅलीचे आयोजन !

चोपडा रोटरी तर्फे भारतातील पहिल्या पर्यावरण पूरक ई बाईक रॅलीचे आयोजन !

चोपडा, प्रतिनिधी - आज जगभरात पर्यावरण विषयक चिंता केली जात आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी ठोस प्रयत्न झाले नाहीत तर मानवाचे आणि पृथ्वीचे भविष्य अंधकारमय आहे, असा इशारा जगभरातील शास्त्रज्ञांनी पर्यावरणवाद्यांनी दिलेला आहे. त्या दृष्टीने विविध स्तरावर पर्याय शोधले जात आहेत.
       जागतिक स्तरावर सुरू असलेल्या या प्रयत्नांमध्ये आपली जबाबदारी ओळखून चोपडा येथील रोटरी क्लबने ई-बाइक रॅलीचे आयोजन करून एक अनोखा आदर्श समाजासमोर उभा केला आहे. रोटरी क्लब चोपडा तर्फे आयोजित रोटरी उत्सव २०२३ च्या प्रचारासाठी भारतातील पहिली पर्यावरण पूरक इलेक्ट्रॉनिक बाईक रॅली चे आयोजन करण्यात केले. जळगाव येथील सीका कंपनीच्या पुढाकाराने रॅलीसाठी सीका कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक बाईक उपलब्ध करून देण्यात आल्या. 
         धरणगाव रस्त्यावरील आनंद सुपर शॉपी येथून सुरु झालेल्या ई बाईक रॅलीचा धनवाडी फाटा, पंकज नगर, बस स्टॅन्ड, ग्रामीण पोलीस स्टेशन, थाळनेर दरवाजा, चिंच चौक, गोलमंदिर, चावडी, डॉ. आंबेडकर चौक, छ. शिवाजी महाराज चौक या मार्गे पुन्हा आनंद सुपर शॉपी येथे समारोप करण्यात आला. कस्तुरबा विद्यालयातील एन. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थींनीचे लेझीम पथक या रॅलीत सहभागी झाले होते.
          या रॅलीमध्ये चोपडा रोटरीचे अध्यक्ष ॲड. रुपेश पाटील, प्रकल्प प्रमुख चेतन टाटिया, उप-प्रकल्प प्रमुख चंद्रशेखर साखरे, तेजस जैन, पृथ्वीराज राजपूत, अर्पित अग्रवाल, खजिनदार पवन गुजराथी, उप-प्रांतपाल नितीन अहिरराव तसेच सीका बाईकचे संचालक राजू दादा पाटील, कस्तुरबा शाळेतील विद्यार्थिनी, शिक्षक एन आर पाटील तसेच रोटरी आणि सीका बाईकचे सर्व पदाधिकारी यांनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

रिपोर्ट: सपोनि विनोद पाटील नेम. म.फुले चौक पोलीस स्टेशन कल्याण प. यांच्याकडुन विषय म.फुले चौक पो.स्टे. कल्याण येचील बेवारस वाहनांची माहीती व...