Wednesday, 1 February 2023

पावशेपाडा येथील महिलेचे'आयकार्ड,धारक चोरट्यांने दिवसाढवळ्या लांबवले गंठन, म्हारळ वरप कांबा परिसरात कायदा व सुव्यवस्थेची ऐसी तैसी ?

पावशेपाडा येथील महिलेचे'आयकार्ड,धारक चोरट्यांने दिवसाढवळ्या लांबवले गंठन, म्हारळ वरप कांबा परिसरात कायदा व सुव्यवस्थेची ऐसी तैसी ?

कल्याण, (संजय कांबळे) : एन एच २०० ब्लॅक कलरची न्यू गाडी, गळ्यात आयकार्ड ची आँरेज पट्टी, आणि डोक्यावर हेल्मेट अशा अनोख्या स्टाईल च्या चोरट्यांने दिवसाढवळ्या पावशेपाडा गावातील महिलेचे दोन तोळयांचे गठंन खेचून धूम ठोकून पळून गेला. त्यामुळे म्हारळ वरप कांबा परिसरात कायदा सुव्यवस्थेची गुन्हेगारांकडून ऐसीतैसी सुरु आहे का?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर आतापर्यंत म्हारळ परिसरातून मागील अनेक गुन्ह्यातील ८/१० आरोपी अटक केली असून या परिसरात पोलिसांची गस्त देखील वाढविली असल्याचे कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी सांगितले.

कांबा ग्रामपंचायत हद्दीतील पावशेपाडा गावातील सरिता एकनाथ पावशे वय ३७ वर्षे या रायते येथून घरी पावशेपाडा येथे येत असताना दुपारी ४:३० च्या दरम्यान गावात पोहचत असताना वरील वर्णन केलेला मोटारसायकल स्वार जवळ येवून २ तोळयांचे गठंन घेऊन कल्याण मुरबाड रस्त्याच्या बाजूला पळून गेला. कोणाला संशय येवू नये म्हणून त्यांनी गळ्यात आँरेज कलरची आयकार्ड पट्टी घातली होती. तो इतक्या वेगात गेला की सरिता पावशे यांनी आरडाओरडा केला परंतु त्याचा काय उपयोग झाला नाही. हा प्रकार जवळच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

एक दिड वर्षांपूर्वी याच गावात ५/६ जणांच्या टोळीने शस्त्रत्र दरोडा टाकला होता. तसेच चेन, मंगळसूत्र खेचून नेण्याची ४थी घटना असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

दरम्यान म्हारळ, वरप कांबा येथे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे विविध अनाधिकृत धंदे यातून होणारे.हानामा-या, मारामारी, खुनी हल्ले, महिलांची छेड, विनयभंग, टपोरीगिरी, धमकावने, ओव्हरशिट, अश्लील चाळे, बेशिस्त व बेदकारपणे गाड्या चालवणे, कर्कश आवाज यातून होणार वाद, याचे प्रमाण भयानक वाढले आहे. काही दिवसांपूर्वी म्हारळ ग्रामपंचायतीचे सदस्य अँड दिपक आहिरे यांच्या गाडिवर हल्ला झाला, म्हारळ परीसरात तोडफोड झाली. यासंदर्भात त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. म्हारळ गावाच्या शेजारी असणारी झोपडपट्टी, उल्हासनगर शहराचा भाग, हा गुन्हेगारांचा अड्डा बनला आहे तसेच आता नव्याने बनलेला मोहिली पुल हा गुन्हेगारासाठी येण्याजाण्यासाठी मोठा सोईचा झाला आहे.

तथापि म्हारळ वरप कांबा या परिसरातील वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी तालुका पोलीस ठाण्याचे वपोनी जितेंद्र ठाकूर यांनी ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी ग्रामस्थांची एक बैठक घेऊन विचारविनिमय व प्रत्यक्षात कृती केली, रात्रीचे पोलिसांचे पेट्रोलिंग वाढवले, शिवाय आंबेडकर चौकात पोलीस तैनात केले. मागील विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये फरार असलेले ८/१० आरोपी  अटक केली आहे. त्यामुळे लवकर परिस्थिती सुधारेल असा विश्वास व्यक्त केला. तर वाढणारी लोकसंख्या व त्या मानाने अपुरे पोलीस बळ यासाठी म्हारळ येथे स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली असल्याचे आमदार कुमार आयलानी यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

रिपोर्ट: सपोनि विनोद पाटील नेम. म.फुले चौक पोलीस स्टेशन कल्याण प. यांच्याकडुन विषय म.फुले चौक पो.स्टे. कल्याण येचील बेवारस वाहनांची माहीती व...