Wednesday, 1 February 2023

lसर्वसामन्यांचे उत्पन्न घटले, करमर्यादा वाढवून फायदा काय ? - शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

सर्वसामन्यांचे उत्पन्न घटले,  करमर्यादा वाढवून फायदा काय ? - शिवसेना नेते चंद्रकांत खैरे 

*मोदी सरकारने अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला*

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १  :  यापूर्वीचा अर्थसंकल्प ज्या राज्यात निवडणूका तिथे जास्त निधी दिला होता, त्यामध्ये कामे केलीच नाही. आता दोन वर्षांपासून सर्वसामन्यांचे उत्पन्न घटले, ते वाढवणे गरजेचे आहे. मग ५ लाखावरून ७ लाख करमर्यादा वाढवून उपयोग काय? असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला.

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला आहे. शेतकरीविरोधी व  भांडवलदारधार्जिणे केंद्र सरकारने नेहमीप्रमाणे महाराष्ट्र राज्यावर अन्याय केला आहे. २. ४० लाख कोटी रुपयांचा खर्च रेल्वे करतील, महाराष्ट्र राज्यातील रेल्वे प्रकल्पाकडे कानाडोळा केला आहे. महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागाच्या पदरी पुन्हा निराशा पडली असून केंद्रीय अर्थसंकल्प दिशाहीन असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली.

कोट्यवधी रुपयांची आकडेमोड बंद करणे गरजेचे आहे. आता बेरोजगारी, महागाई आणि उत्पन्न कसे वाढेल यासाठी प्रयत्न करा, कर्ज काढून व कर्जपुरवठा करून केंद्राच्या संस्था मोडकळीस आल्या, त्या वाचवा, असे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

रिपोर्ट: सपोनि विनोद पाटील नेम. म.फुले चौक पोलीस स्टेशन कल्याण प. यांच्याकडुन विषय म.फुले चौक पो.स्टे. कल्याण येचील बेवारस वाहनांची माहीती व...