Sunday, 26 February 2023

नळपाणी पुरवठा सुरु न झाल्यास प्रदिप वाघ यांचा आंदोलनाचा इसारा !

नळपाणी पुरवठा सुरु न झाल्यास प्रदिप वाघ यांचा आंदोलनाचा इसारा !

जव्हार, जितेंद्र मोरघा -
 
मोखाडा तालुक्यातील कारेगाव, गोमघर, चास व अनेक गावांतील नळपाणी पुरवठा योजना कित्येक वर्षे झाली तरी देखील अपुर्ण अवस्थेत असल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे, याबाबत सातत्याने पाठपुरावा केला असुन देखील प्रशासन व ठेकेदार लक्ष देत नाही त्यामुळे भिषण पाणी टंचाई निर्माण होणार आहे याला जबाबदार यंत्रणेवर कारवाई करावी व तातडीने पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू करावी.
तसेच अनेक योजना अर्धवट सोडून ठेकेदारानी लक्ष दिलेले नाही, ग्रामपंचायत कडे हस्तांतरित करण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे देखभाल दुरुस्ती व लाईट बिलाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वरील सर्व योजना जर येत्या दहा दिवसांत पुर्ण झाल्या नाहीत तर तिव्र जन आंदोलन करणार असल्याचे  प्रदीप वाघ यांनी सांगितले आहे.तसा इशारा त्यांनी लेखी पत्र देऊन प्रशासनाला केला आहे.

No comments:

Post a Comment

डॉ. अविनाश सकुंडे यांची आंतरराष्ट्रीय इ.व्हि.आणि ए.आय. चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्ती !

डॉ. अविनाश सकुंडे यांची आंतरराष्ट्रीय इ.व्हि.आणि ए.आय. चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्ती ! मुंबई, (शांतार...