कासटवाडी येथे पाण्याच्या टाकीचे भुमिपुजन !
जव्हार, जितेंद्र मोरघा -
जव्हार तालुक्यातील कासटवाडी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच कल्पेश विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून ग्रामपंचायत मधील कामे लवकरात लवकर पूर्ण होऊन गावचा विकास कसा साधता येईल आणि ग्रामपंचायत कशी टँकरमुक्त होऊन, ग्रामस्थांना होणार त्रास कसा कमी होईल या विचाराने, जीवन मिशन, राज्य पाणी आणि स्वच्छता मिशन महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या कासटवाडी ग्रामपंचायत मधील कासटवाडी, गरदवाडी, जाधवपाडा या ठिकाणी पाण्याच्या टाकींचे भूमिपूजन सोहळा गुलाब विनायक राऊत मा. सभापती महिला व बालकल्याण समिती जिल्हा परिषद पालघर,पंचायत समिती सदस्य विनायक राऊत, ग्रामपंचायत सदस्य- बाळू भोये, पत्रकार नामदेव खिरारी, ग्रामस्थ प्रकाश कवदरे ,भालचंद्र शिंदे, उमेश खिरारी, राहुल शेंडे, संतोष मोकाशी, रोजगार सेवक किसन तुंबडा, कल्पेश राऊत लोकनियुक्त सरपंच उपस्थित राहून ग्रामस्थांना आश्र्वाशित केले की आपल्याला लवकरच नवीन पाणी पुरवठा होऊन आपल्याला जी पाण्याची अडचण लवकर दूर होऊन आपले गाव लवकरच टँकर मुक्त होतील सरपंच कल्पेश राउत आश्वाशन दिले.
No comments:
Post a Comment