जय अंबे माता ट्रस्ट घ्या वतिने सरपंचाना दिली पुस्तके भेट !
जव्हार, जितेंद्र मोरघा :
जय अंबे ट्रस्ट कुर्ला यांच्या कडुन सुर्यमाळ ग्रामपंचायत च्या सरपंच गीता पाटील यांना विविध योजनांची व कायद्याची पुस्तके भेट देण्यात आली.यावेळी प्रदीप वाघ यांनी ट्रस्टचे पदाधिकार्यांचे स्वागत केले.
यावेळी राहुल शिंदे संस्थापक अध्यक्ष, निलेश पाटील उपखजिनदार, दिलीप जाधव, मार्गदर्शक, पद्माकर हबिब जेष्ठ मार्गदर्शक, पंढरी डोहाळे सदस्य, यांनी, उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. शिंदे यांनी सांगितले की सर्व सरपंचांनी योजनांचा अभ्यास करून विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचावा.
यावेळी प्रदीप वाघ, संजय वाघ माजी सरपंच, मंगेश दाते माजी सरपंच, दशरथ पाटील सदस्य, भारत बुधर,गीता पाटील सरपंच इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment