शिवसेना प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा सामाजिक कार्यकर्ते संस्थापक यशवंत खोपकर पनवेल येथे सन्मानित !
मुंबई (शांताराम गुडेकर )
सौ. जयश्रीमाई सावर्डेकर व अनंत मंगल संस्था यांच्यावतीने अंतरराष्ट्रीय मानव अधिकार राजदुत संघटना, माहीती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना व भारतीय महाक्रांती सेना अंतरराष्ट्रीय अध्यक्ष (म.आ.) जयश्री माई सावर्डेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार/सत्कार सोहळा शीतलधारा कॉम्प्लेक्स पनवेल येथे थाटामाटात संपन्न झाला. सौ.जयश्री माई सावर्डेकर यांच्या हस्ते एस.के.मुझीक ग्रुप सुधीर कदम, मनोज कदम, स्वाती पांचाळ तसेच सर्व गायक कलाकार यानाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सामाजिक कार्यकर्ते मदतीचा हाथ देणारे संस्थापक श्री.यशवंत खोपकर व त्याच्या सहका-यांना सौ. जयश्री माई सावर्डेकर यांच्या शुभहस्ते दोन सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार मायेची सावली एक हात कर्तव्याचाचे संस्थापक श्री.यशवंत खोपकर, कमेटी मेंबर सदिप चादिवडे, श्री. राजेन्द्र पेडणेकर, श्री.श्रीकांत चिचपुरे, यानाही सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार प्राप्त झाल्याबदल मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थापक श्री.यशवंत खोपकर आणि पदाधिकारी यांना अनेकांकडून अभिनंदनसाह शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment