Saturday, 25 February 2023

माऊली ग्रुप आणि उत्संग आऊंडेशन मार्फत नागरिकांना व्हाॅटर व्हील वाटप !

माऊली ग्रुप आणि उत्संग आऊंडेशन मार्फत नागरिकांना व्हाॅटर व्हील वाटप !

माऊली ग्रुप व सत्संग फाउंडेशन डोंबिवली  यांच्या संयुक्त विद्यमाने नाशेरा या गावामध्ये तब्बल 140 कुटुंबाना व्हाॅटर व्हील मोफत वाटण्यात आले. या उपक्रमासाठी भा.ज.पा. आदिवासी आघाडी पालघर जिल्हयाचे  जिल्हाध्यक्ष मिलिंदजी भाऊ झोले तसेच त्यांच्या मातोश्री जिल्हा परिषद सदस्यां पालघर जिल्हा  कुसुमताई झोले यांच्या अतोनात प्रयत्नाने व त्यांच्या विनंतीस मान देऊन माऊली ग्रुप व सत्संग फाउंडेशन या तिघांचा जोड होऊन हा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी पार पडला.

यावेळी भाजपाचे कार्यकर्ते गंगाराम फसाळे तसेच नाशेरा गावचे सरपंच रवी धिंडा  व नाशेरा गावचे माजी सरपंच दादू हाडोंगा साहेब तसेच गावातील इतर मान्यवर उपस्थीत होते.

वृत्तांकन - जितेंद्र मोरघा


No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...