Tuesday 28 February 2023

मराठी राजभाषा दिनानिमित्त कल्पराज फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम !

मराठी राजभाषा दिनानिमित्त कल्पराज फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम !

साहित्यिकांच्या सन्मान सोहळ्याने मराठी राजभाषा दिन साजरा

शहापूर, (एस. एल. गुडेकर) :
          मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधत कल्पराज फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष,साहित्यिक व महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक विजयकुमार देसले यांच्या संकल्पनेतून साहित्यिकांचा सन्मान सोहळा सोमवारी  शहापुरातील रिअल अकॅडमी, काबाडी प्लाझा,शहापूर येथे मोठ्या दिमाखात पार पडला.

           साहित्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मधुकर हरणे, महेशकुमार धानके, शरद पांढरे, संजय गगे खरीडकर, शिवाजी सातपुते, प्रकाश फर्डे, नवनीत यशवंतराव, प्रमोद पाटोळे, शर्मिला पाटोळे, वसंत निमसे, मुकेश दामोदरे, मनाली दामोदरे, रुपेश बोराडे, प्रशांत चौधरी, संजय चौधरी, विजय धानके, सुनील म्हसकर, साईनाथ भालके, निळकंठ विशे, जयराम मांजरे आदी साहित्यिकांना सन्मानपत्र, पुस्तक, भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान ग्राफिक्सचे अप्रतिम काम करणाऱ्या योगिता गोडेचा देखील विशेष सन्मान करण्यात आला.

       आई-वडिलांच्या नावाने स्थापन केलेल्या कल्पराज फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध उपक्रमांची विजयकुमार देसले यांनी माहिती दिली.भविष्यातही फाऊंडेशनचे सल्लागार सेवानिवृत्त केंद्रप्रमुख राजाराम देसले यांच्या मार्गदर्शनानुसार शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.शहापूर भूमीला साहित्यिकांचा वारसा आहे. भविष्यात एखादे भव्यदिव्य साहित्य संमेलन शहापूर नगरीत आयोजित व्हावं हा आशावादही त्यांनी यावेळी मान्यवरांसमोर व्यक्त केला.

       या कार्यक्रमासाठी शिवसेना उपजिल्हा प्रमुख  शंकर खाडेपाषाणे तत्वज्ञान ज्ञानपीठाचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. कैलास महाराज निचिते, साहित्यिक व साप्ताहिक शिवमार्गचे संपादक महेशकुमार धानके, योगगुरु अब्दुल शेख, रिअल अकॅडमीचे संचालक राजपूत व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी कल्पराज फाऊंडेशनच्या कार्याचे भरभरुन कौतुक करत भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या.
        या कार्यक्रमासाठी नंदकिशोर पानसरे, नामदेव बांगर, तुकाराम देसले, निळकंठ विशे, पांडुरंग भेरे‌ तसेच रिअल अकॅडमी येथील सर्व स्टाफने मौलिक योगदान दिले. या कार्यक्रमात आपल्या खुमासदार शैलीने साईनाथ भालके यांनी रंगत भरत अप्रतिम सूत्रसंचालन केले तर उपक्रमशील शिक्षक जयराम मांजरे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...