Tuesday 28 February 2023

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तथा अध्यक्ष जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ठाणे यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय अपूर्ण घरकुल लाभार्थ्यांची कार्यशाळा रायते येथे संपन्न !

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तथा अध्यक्ष जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ठाणे यांच्या अध्यक्षतेखाली  तालुकास्तरीय अपूर्ण घरकुल लाभार्थ्यांची कार्यशाळा रायते येथे संपन्न ! 

कल्याण, (संजय कांबळे) : अमृत महाआवास अभियान अंतर्गत अपूर्ण घरकुल लाभार्थ्यांची कार्यशाळा आदित्य अँग्रो फार्म, ग्राम पंचायत रायते, तालुका कल्याण येथे पंचायत समिती कल्याण तर्फे आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये कल्याण तालुक्यातील घरकुल सुरु नसलेले व अपूर्ण घरकुल काम असलेले लाभार्थी, सर्व ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक, जलसुरक्षक, ग्रा.प.कर्मचारी व पं.स. स्तरावरील सर्व विस्तार अधिकारी तसेच घडामोडींचा मागोवा घेणारे पत्रकार श्री.संजयजी कांबळे स्वयंर्स्फूतीने आवर्जून उपस्थित होते.
 

सदर कार्यशाळेस प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ठाणे श्रीम. छायादेवी शिसोदे मॅडम यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लावली. त्याचप्रमाणे अनिवार्य कारणास्तव प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य झाले नसल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.ठाणे मनुज जिंदल सर व  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते मॅडम हे ऑनलाईन झूम लिंकद्वारे कार्यशाळेत सहभागी झाले व लाभार्थीशी संवाद साधून महत्वपुर्ण मार्गदर्शन केले. 

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व लाभार्थ्यांनी अपूर्ण असलेली घरे तातडीने पूर्ण करणे व छपरा पर्यत काम झालेली सर्व घरकुले आठ दिवसात पूर्ण करणेबाबत निर्देश दिले व घरकुल कामाचे कार्यवाही बाबत प्रशंसा करुन उपस्थित सर्वाना प्रोत्साहीत केले... अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी इतर राज्यात नियोजित वेळेपूर्वी घरकुले पूर्ण होतात बिहार, झारखंड सारख्या राज्यात कमी वेळेत घरकुले पूर्ण होतात मग आपली घरकुले ही योग्य नियोजन व त्यानुसार कार्यवाही केली तर नक्कीच काल मर्यादेत पुर्ण होतील व पूर्ण करावीत ही अपेक्षा लाभार्थी, ग्रामसेवक व तालुका स्तरावरील यंत्रणा यांचेबाबत व्यक्त केली. प्रकल्प संचालक यांनी अमृत महाआवास अभियान बाबत लाभार्थ्यांना माहिती दिली व अभियानाच्या या तिसऱ्या वर्षात देखील आपल्याला पहिल्या दोन वेळेप्रमाणे पुरस्कार मिळवायचा आहे असे सांगितले. सुरु नसलेली घरकुल कामे तातडीने सुरु करुन अपूर्ण घरकुले 31 मार्च 2023 पूर्वी पूर्ण करणेबाबत सुचना दिल्या. 

गट विकास अधिकारी, पंचायत समिती कल्याण अशोक भवारी यांनी सर्व लाभार्थ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व घरकुले पूर्ण करणेबाबत लाभार्थ्यांशी संवाद साधला. तसेच घरकुल बांधून झाल्यानंतर देखील इतर योजनांचा लाभ अभिसरणाद्वारे लाभार्थी कसा घेऊ शकतो व आदर्श घरकुल होऊ शकते याचे मार्गदर्शन केले. सर्व पूरक योजनांची माहिती तसेच पंचायत समिती अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती गट विकास अधिकारी यांनी दिली... घोलप वि.अ. (कृषी) यांनी शेती विषयक योजनांची माहिती लाभार्थ्यांना दिली... संत, वि.अ. (कृषी) यांनी सुरु नसलेल्या घरकुल लाभार्थी यादीचे वाचन केले प्रत्येक लाभार्थ्यांशी संवाद साधून घरकुल कामे तातडीने सुरु करावीत असे सांगितले. श्रीम. परटोले, वि.अ. (सांख्यिकी) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन केले. त्याचप्रमाणे गगे, शाखा अभियंता (बांधकाम) यांनी घरकुल बांधकामाबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे संपुर्ण नियोजन व व्यवस्थापन यशस्वीपणे पुर्ण केलेले हरड, वि.अ.(पंचायत) यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. 

सदर कार्यशाळेमध्ये लाभार्थी यांनीसुध्दा आपल्या अडचणी मांडल्या व त्यावरील उपाय योजना झालेमुळे व घरकुल काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करु असे आश्वासित केले. तसेच परसबाग, शोषखडडे, जलपुर्नभरण, शौचालय इत्यादी सुविधांनी युक्त आदर्श घरकुल करणेबाबत प्रयत्न करु असे सांगितले. सदरची कार्यशाळा यशस्वी होणेकामी सर्व वि.अ., सर्व ग्राविअ, ग्रामसेवक, घरकुल कक्षाचे लिपीक श्रीम. पेढवी, डाटा एन्ट्री ऑपरेटर श्रीम. लोणे, तालुका समन्वयक गणेश शेलार तसेच पंचायत समिती कल्याण कार्यालयातील सर्व विस्तार अधिकारी, कर्मचारी,चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी संपुर्ण सहकार्य केले.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...