Saturday, 25 February 2023

वाहतुक व्यवस्थेत बदल बाबत ......

वाहतुक व्यवस्थेत बदल बाबत ......

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २५ : दि.27/02/2023 ते दि. 28/02/2023 या दरम्यान G-20 गटातील विविध देशातील सदस्य हे वेरूळ लेणी येथे भेट देणार आहे वेरूळ गाव व वेरूळ लेणी ही ठिकाणे  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 लगत येत असल्याने अतिथी ये जा करण्याच्या दरम्यान कोंडी होण्याची शक्यता आहे. तसेच खुलताबाद ते फुलंब्री मार्गावर सुध्दा मोठ्या प्रमाणावर वाहनांची वाहतूक सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९४१ चे कलम ३३ (१)(ब), ३४ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारा नुसार सदर यात्रा चालु असे पावेतो खालील प्रमाणे वाहतुकी मध्ये बदल करुन दि.27/02/2023  ते दि. 28/02/2023 पर्यंत सर्व प्रकारचे जड वाहने बंद ठेवण्याचे आदेश निर्गमीत करण्यात येत आहे.

नमुद कालावधीत खालील प्रमाणे पर्यायी मार्गाचा वापर करण्यात यावा.

• औरंगाबाद दौलताबाद मार्गे- वेरुळ  कन्नडकडे जाणारी जड वाहतुक      औरंगाबाद दौलताबाद टी. पॉईन्ट (शेरनापुर) कसाबखेडा- वेरुळ मार्गे कन्नडकडे जातील.
• वेरुळ खुलताबाद दौलताबाद मार्गे औरंगाबाद येणारी वाहतुक       वेरुळ कसाबखेडा दौलताबाद टि पॉईन्ट औरंगाबाद जाईल.
• फुलंब्री खुलताबाद- वेरुळ जाणारी जड वाहतुक     फुलंब्री औरंगाबाद नगरनाका दौलताबाद टि पॉईन्ट | कसाबखेडा- वेरुळ मार्गे जड वाहतुक कन्नडकडे जाईल
• वेरुळ खुलताबाद फुलंब्री जाणारी जड वाहतुक     वेरुळ कसाबखेडा दौलताबाद टि पॉईन्ट मार्गे औरंगाबाद अशी जाईल

तरी सर्व वाहन धारकांनी नमुद कालावधीत पर्यायी मार्गाचा वापर करावा, जेणे करुन वाहतुकीची कुठल्याही प्रकारे कोंडी होणार नाही, वाहतुक नियमाचे पालन करुन पोलीसांना सहकार्य करावे.

No comments:

Post a Comment

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण पदक जाहीर !

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण...