Saturday, 25 February 2023

केंद्रिय पंचायत राज "राज्य मंत्री" श्री कपिल पाटील यांच्या हस्ते कोपर ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन ! 'गावात आनंदाचे वातावरण'

केंद्रिय पंचायत राज "राज्य मंत्री" श्री कपिल पाटील यांच्या हस्ते कोपर ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन ! 'गावात आनंदाचे वातावरण'

भिवंडी, दिं,२५, अरुण पाटील (कोपर) :
          कोपर ग्रामपंचायतीचे सरपंच श्री.हेमंत घरत यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या विकास कामंसाठी खासदार तथा केंद्रीय पंचायत राज "राज्य मंत्री"श्री.कपिल पाटील यांनी वेळात वेळ काढून आज दिं. २५/२/२०२३ रोजी कोपर ग्राम पंचायतीच्या विविध विकास कामांचे भमिपूजन केले आहे .या वेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. मा. मंत्री श्री.कपिल पाटील यांनी भूमी पूजन केल्याने गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
          मा.मंत्री कपिल पाटील साहेबांनी नेहमीच कोपर गावावर प्रेम केले आहे. त्या मुळे कोपर गावच्या प्रत्येक विवीध विकास कामासाठी ते वेळात वेळ काढून हजेरी लाऊन ग्रामस्थांना योग्य मार्गदर्शन व मदत करतात. त्या मुळे सद्या मनसे, शिवसेना वगळता संपूर्ण गाव भाजपामय झाले आहे. आज नवतरूणांनी मा. देवेश (बबलू) पाटील यांच्या उपस्थितीत भाजप युवा मोर्चात प्रवेश केल्याने तरुणांमध्ये नव चैतन्य निर्माण झाले आहे.
        या वेळी मा.पंचायत राज "राज्य मंत्री" यांनी हर घर जल, हर घर नळ च्या माध्यमातून नळ जीवन मिशन योजने अंतर्गत "जल कुंभाचे" भूमी पूजन केले. जिल्हा परिषद शाळेच्या नवीन शाळेचे भुमी पूजन केले.तसेच तलाव गार्डन सुशोभीकरण व तरुणांना खेळण्यासाठी खेळाच्या मैदानाचे देखिल भूमी पूजन करण्यात आले. तसेच जुन्या श्री गणेश हनुमान मंदिराच्या जागेवर नवीन मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले.
          मा.मंत्री यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात सांगितले की, केंद्रातून आपल्या भिवंडी तालुक्यासाठी १९६ विविध योजना आल्या आहेत. गावांचा विकास शहरांप्रमाणेच झाला पाहिजे त्या साठी पाणी, शिक्षण, आरोग्य हे चांगले मिळाले पाहिजे. या गावात महिला पुरुष भेदभाव नाही त्या मुळे आरक्षण नसताना देखिल गावाने महिला सरपंच बनवला. असेही मंत्री महोदयांनी पुढे सांगितले.
           या भूमी पूजा सोहळ्यासाठी शिवसेनेचे आमदार मा. श्री शांताराम मोरे, भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मा. श्री. देवेश (बबलू) पाटील, बिजीपीचे श्री.पी.के.म्हात्रे, मनसेचे मा. श्री. डी. के. म्हात्रे, ग्रामपंचायत कमिटी, कर्मचारी वृंद, ग्रामस्थ, व इतर मान्यवर उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण पदक जाहीर !

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण...