प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे निर्माण झाले पाणी टंचाई !
जव्हार, जितेंद्र मोरघा -
मोखाडा तालुक्यातील सायदे मारुतीवाडी धरणाची पाणी गळती गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे परंतु धरणाचे दुरुस्ती चे काम हाती घेतले नसुन त्यामुळे धरणा खालील गावांना पाणी टंचाई ला सामोरे जावे लागते, या बाबतीत प्रदीप वाघ यांनी सातत्याने जिल्हा प्रशासनाला पत्र देऊन देखील कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याचे येत्या काही दिवसांत जर काम सुरू झाले नाही तर तिव्र आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
तसेच अनेक पाणी पुरवठा योजना देखील अपुर्ण अवस्थेत असल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे टॅकर चा खर्च संबंधित जबाबदार यंत्रणे कडुन वसुल करावा असे ही मत प्रदीप वाघ यांनी व्यक्त केले आहे.
No comments:
Post a Comment