Sunday 26 February 2023

सोयगाव वन विभागाच्या सतर्कतेमुळे वेताळवाडी जंगलात लागलेली आग आटोक्यात !

सोयगाव वन विभागाच्या सतर्कतेमुळे वेताळवाडी जंगलात लागलेली आग आटोक्यात !

     वेताळवडीच्या जंगलात रात्री आगीने घातलेला विळखा 

सोयगाव, दिलीप शिंदे, दि.२६... अजिंठ्याच्या डोंगरात वेताळवाडी च्या जंगलात पश्चिम वनक्षेत्रात शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास आगीचा वणवा पेटला दरम्यान आगीचा वणवा रौद्ररूप धारण करून सिल्लोड तालुक्यातील वनक्षेत्रात पुढे सरकत होता मात्र सोयगाव वनक्षेत्र विभागाचे पथकांनी रात्री घटनास्थळी धाव घेवून मध्यरात्री एक वाजेपर्यंत आग नियंत्रणात आणली होती.दरम्यान सोयगाव वनपरिक्षेत्र विभागाच्या पथकाची वेळीच उपाय योजना मुळे सोयगाव चे वेताळवाडी जंगलातील वनसंपदा आगीच्या विळख्यातून बचावली आहे मात्र तरीही आगीच्या विळख्यात दोन ते तीन हेक्टर क्षेत्र जळून झाक झाले असल्याची माहिती वनविभागाच्या प्राथमिक अहवालात नमूद आहे.

सोयगावच्या वेताळवाडी पश्चिम वनक्षेत्रात शनिवारी रात्री (दि.२५) आग लागल्याचे वनकर्मचारी यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ भ्रमणध्वनी द्वारे वरिष्ठांना माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारीअनिल मिसाळ यांच्या मार्गदर्शनखाली वनपाल गणेश सपकाळ यांनी दोन पथके तयार करून घटना स्थळी रवाना केले. आगीने उग्र रूप धारण झाले परंतु आग नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वीच दोन्ही पथकांनी दोन्ही बाजूने ब्लोअर मशीन व झाडाच्या फांद्यानी आग आटोक्यात आणली व आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविले. सदर कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल गणेश.सपकाळ, व्ही. आर. नागरे वनरक्षक, जी.टी.नागरगोजे वनरक्षक, शरद चेके वनरक्षक, नितेश मुलताने ,कृष्णा पाटील व वनमजूर यांनी पूर्ण केली. 
सोयगाव वन परिक्षेत्र वन, वन्यजीव व वनसंपत्ती यांच्या संरक्षणासाठी प्रभावी उपाय योजना करीत असून आगीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी वन हद्दी लगत असणाऱ्या शेतकऱ्यांना नोटीसे द्वारे  बंधारे न जाळण्याचे सूचित करण्यात येणार असल्याचे या वेळी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री अनिल मिसाळ यांनी सांगीतले..

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...