Sunday 26 February 2023

कल्याण नगर मार्गावरील माळशेज घाट खड्यात, पोलीस चौकी समोरच जीवघेणे खड्डे, रेल्वे ठेवा बाजूला पहिले रस्ते द्या ?

कल्याण नगर मार्गावरील माळशेज घाट खड्यात, पोलीस चौकी समोरच जीवघेणे खड्डे, रेल्वे ठेवा बाजूला पहिले रस्ते द्या ?

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण नगर महामार्गावरील माळशेज घाट अक्षरशः खड्यात गेला असून तळवली पुलापासून  मढच्या पुढे पर्यंत या मार्गावर खड्डेच खड्डे पडले असून मोरोशी नाका पोलीस चौकी समोरच जीवघेणी खड्डे आहेत. याशिवाय माळशेज घाट परिसरातील अनेक गावाना रस्ते नाहीत ज्या गावाला रस्ते आहेत ते असूनही नसल्यासारखे असल्यामुळे रेल्वे ठेवा बाजूला प्रथम जमीनीवर चालण्यासाठी रस्ते द्यावे अशी संतप्त भावना येथील ग्रामस्थांनी बोलून दाखवली.

कल्याण नगर मार्गावरील माळशेज घाट हे पर्यटन केंद्र म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या घाटात दरवर्षी पावसाळ्यात हजारो पर्यटक येतात. त्याचप्रमाणे ओतून, नारायणगाव, मंचर, जुन्नर अशा बाजारपेठा असल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते, भाजीपाला, कांदे, इतर अवजड वाहतूक या मार्गावर सतत चालू असते. नुकतीच सावर्णे येथे पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते कल्याण नगर मार्गाचे सिंमेट काँक्रीटीकरण चे उद्घाटन झाले होते. ते सावर्णे येथे बंद आहे. मढ बाजूला सुरू आहे.
असे असलेतरी सध्या माळशेज घाटात तळवली पुलापासून  फांगुळगव्हाण, डोंगरवाडी, शिसवेवाडी, मोरोशी, थितवी, मढ, पिपळगावधरण पुलापर्यत रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. याहून आश्चर्याची बाब म्हणजे टोकावडे पोलीस चौकी अंतर्गत मोरोशी नाका पोलीस चौकी समोर एक ते दिड फुट खोल खड्डे पडले आहेत. येथे तसेच इतर ठिकाणी अनेक वेळा जीवघेणे अपघात झाले आहेत व होतात पण याकडे लक्ष द्यायला लोकप्रतिनिधी,मंत्री, आमदार, खासदार, नँशनल हायवे अँथोरटी किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळ नाही.

इतकेच नव्हे तर या घाटातील आंबोमाळी या ३०/४० लोकवस्ती असलेल्या गावाला रस्ताच नाही, तर फांगुळगव्हाण, मोरोशी, साकिरवाडी, निरगुडपाडा, चिंचवाडी, थितवी, वाघवाडी, शिसवेवाडी, फांगणे, आवळीची वाडी आदी गावांचे रस्ते असून नसल्यासारखे झाले आहेत. 

याला राजकारण कारणीभूत ठरते आहे. ते इतके टोकाचे झाले आहे की, या गावातील काही तरुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जंयतीचे निमंत्रण देण्यासाठी एका लोकप्रतिनिधीकडे गेले असता, साहेब आमच्या गावात रस्ता नाही, याकडे लक्ष द्यावे अशी विंनती केली असता, त्यावर तूम्ही दुसऱ्या कडून तूमचा रस्ता मंजूर करून घेतला ना? तो कसा होतो तो मी पाहतो? असा दमच या तरुणांना देण्यात आला,
आता बोला, जनतेने निवडून दिलेला लोकप्रतिनिधी असे बोलत असेल तर त्या गावाचे काय? सध्या मुरबाड रेल्वे चा विषय चर्चेला जात आहे. यावर येथील ग्रामस्थांना विचारले असता, पहिल्यांदा आम्हांला जमीनीवर चालण्यासाठी रस्ते द्या, मग रेल्वेचे स्वप्ने दाखवा अशी संतप्त भावना या ग्रामस्थांनी बोलून दाखविली. या परिसरातील ग्रामपंचायत आप आपल्या परिने नागरिकांना सोईसुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु त्यांना मर्यादा येत असल्याने 'विकास, होत नाही. परंतु शासनाचे काय? खरेच सरकारचे यांच्या कडे लक्ष आहे,?तर उत्तर नाही असेच द्यावे लागेल व या परिसरातील विकास 'कोठे हरवला आहे, याचा शोध घ्यावा लागेल.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...