Sunday 26 February 2023

वेरूळ- अजिंठा महोत्सवात दुसऱ्या दिवशी शहरवासीयांना मिळाली संगीताची मेजवानी !

वेरूळ- अजिंठा महोत्सवात दुसऱ्या दिवशी शहरवासीयांना मिळाली संगीताची मेजवानी !

'उस्ताद सुजाद हुसेन खान' यांचे सतार वादन आणि गायनाला रसिकांची उत्स्फूर्त दाद... 

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २६ :  
शहरवासीयांचा रविवार खऱ्या अर्थाने सत्कारणी लागला. आज सलग दुसऱ्या दिवशी संगीत प्रेमींना संगीताची मेजवानी मिळाली. उस्ताद सुजाद हुसेन खान यांचे सतार वादन आणि गायनाला मायबाप रसिकांनी भरभरून दाद दिली तर ताल वाद्याचे जादूगार पद्मश्री शिवमणी यांच्या वादनाने रसिकांना खेळून ठेवले. शेवटी ताल वाद्याचे जादूगार पद्मश्री शिवमणी तसेच अदिती भागवत यांच्या लावणीने संगीत मैफिलीचा समारोप झाला.

महाराष्ट्र पर्यटन संचालनालय व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय  महोत्सवास शनिवारपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील सोनेरी महल मध्ये प्रारंभ झाला. 

आज रविवारी  पहिल्या सत्रामध्ये उस्ताद सुजाद हुसेन यांनी यमन कल्याण रागाने सतार वादनाला प्रारंभ केला.   रसिकांनी उस्फूर्त दाद दिली. सतार वादनानंतर त्यांनी काही गजल सादर करून रसिकांची मने जिंकली. मेरे हिस्से से कोई नही या गझलला तर रसिक प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. सितार वादन आणि गायनातील त्यांनी आपली हुकूमत दाखवून दिली त्यांना तबल्यावर अमित चोबे आणि पंडित मुकेश जाधव यांनी सुरेख साथ दिली.

दुसऱ्या सत्रामध्ये ताल वाद्याचे जादूगर पद्मश्री शिवमणी यांनी एकाच वेळी विविध प्रकारचे वाद्य वाजवून रसिकांची वाह वाह मिळवली.त्यांना सतार वादक रवी चारी, गिटार वादक सेल्देन डी सिल्वा, खंजिरा वादक सेल्व गणेश  आणि सितार वादक संगीत हळदीपूर यांनी साथ संगत केली.अदिती भागवत यांच्या कथक नृत्याने तर या संगीत मैफिलीला चार चांद लावले. यावेळी लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त दिलीप शिंदे, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना पोलीस आयुक्त निखिल गुप्ता आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...