Tuesday 28 February 2023

ग्रामस्थांनी दिले शाळेला साहीत्य वाद्य !

ग्रामस्थांनी दिले शाळेला साहीत्य वाद्य !

जव्हार, जितेंद्र मोरघा -

शाळा म्हटले की एक मंदिरच आहे, असे सांगायला वावगे जाणार नाही. कारण शाळेमधून खूप काही आपण शिकून आणि मोलाचे अनुभव घेत असतो आणि अश्या वेळी आपल्याला काही कारणास्तव विविध ठिकाणाहून येणाऱ्या व्यक्ती मोलाचे मार्गदर्शन करतात तसेच काही भेट म्हणून वस्तू देऊन जातात.

अश्याच प्रकारे किनिस्ते येथील जिल्हा परिषद शाळेला ग्रामस्थ व पालक बाळकृष्ण शिंदे यांनी शाळेसाठी वाद्य साहित्य भेट दिले आहे, ग्रामस्था कडुन स्वखर्चाने दिलेल्या या अनोख्या भेटी मुळे सर्व पालकांनी व ग्रामस्थांनी शिंदे यांचे कौतुक केले आहे.
यावेळी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यां साठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती च्या वतिने सन्मानित करण्यात आले. यावेळी श्री प्रदीप वाघ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की ग्रामस्थ, पालक, शिक्षक व विद्यार्थी यांनी शाळेसाठी एकत्र येऊन काम केले तर नक्कीच शाळेच्या दर्जा सुधारला जाईल, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करुया, पालक व शिक्षक यांचे नाते निर्माण झाले पाहिजे, माझ गाव व माझी शाळा या भावनेने काम केले तर नक्कीच आदर्श शाळा घडायला वेळ लागणार नाही.

यावेळी श्री मंगेश दाते यांनी देखील मनोगत व्यक्त करताना सांगितले की गावकरी नेहमीच शाळेच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत, शिक्षकांना सर्व सहकार्य केले जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच किनिस्ते व वाकडपाडा केंद्र स्तरीय शिक्षण परिषदेला हि  प्रदीप वाघ यांनी मार्गदर्शन केले, पोर्याचा पाडा येथील जिल्हा परिषद शाळेत श्रीमती ढेरे यांनी शिक्षण परिषदेचे यशस्वी आयोजन केले होते.

कार्यक्रमास  प्रदीप वाघ, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष  चंद्रकांत दाते, केंद्र प्रमुख  नागु विरकर, नंदकुमार वाघ उपसरपंच,  संजय वाघ माजी सरपंच,  गणेश खादे,  ग्रामपंचायत सदस्य, बाळकृष्ण शिंदे,  दिपाली शिंदे, मुख्याध्यापक  सुरेश हमरे,  ढेरे व केंद्रातील सर्व शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...