Wednesday 1 March 2023

नालासोपारातील सामान्य नागरीकांच्या समस्यांबाबत भ्रष्ट वसई विरार प्रभाग समिती ई विरोधात शिवसेनेचे आमरण उपोषण.....

नालासोपारातील सामान्य नागरीकांच्या समस्यांबाबत भ्रष्ट वसई विरार प्रभाग समिती ई विरोधात शिवसेनेचे आमरण उपोषण.....

वसई, प्रतिनिधी : नालासोपारा (प)  समेळपाडा येथिल स्मशानभूमीत एक वर्ष झाले विद्युत शव दाहिनी बसवण्यात आली आहे, पण महापालिकेला विद्युत शव दाहिनी चालु करण्यास अद्याप मुहूर्त मिळत नाही.

समेळपाडा हा परिसर दाट लोकवस्तीचा परिसर आहे, जास्त लोकसंख्या असल्याने  मृत्यू दर हि त्याप्रमाणात आहे,
अंत्यविधीसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष तोड होऊन पर्यावरणाचा र्‍हास होतो, तसेच अनेक नागरीकांना इच्छा असुन ही विद्युत दाहिनीचा वापर करता येत नाही, कारण समेळपाडा स्मशानभूमीत विद्युत दाहिनी सुरू नाही,
पावसाळ्यात नागरीकांची गैरसोय होऊ नये यासाठी  समेळपाडा स्मशानभूमीत विद्युत शव दाहिनी सुरू करण्यास वारंवार मागणी करून हि महानगरपालिका प्रभाग समिती ई हलगर्जीपणा करत आहे.

नालासोपारा (प) मधिल सत्यम शिवम शॉपिंग सेंटर व सोनल शॉपिंग सेंटर मधिल  रेल्वे स्टेशन ला जाणाऱ्या रस्त्यावर अनधिकृत फेरीवाले व दुकानदारांनी रस्त्यावर दुकान वाढवून रस्ता अरुंद केल्याने नागरीकांना जाण्यायेण्यास ही रस्ता राहिला नाही महापालिका प्रभाग समिती ई दरवेळेस धातुर मातुर कारवाई करून दिखाऊपणा करण्याचे काम करत आहे,
या यारस्त्यावरील होणारा त्रास कायमचा सोडवून रस्त्ता मोकळा करावा अशी मागणी नागरीकांनी माझ्याकडे केली असुन याचा नाहक त्रास प्रवास करून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना करावा लागत आहे, अनधिकृत फेरीवाल्यांबाबत योग्य नियोजन करत त्यांना स्थलांतरीत करण्यात यावे या रस्त्यावर ज्या अनधिकृत फेरीवाले व दुकानदारांनी अरूंद रस्ता करून  रेल्वे प्रवासी व नागरीकांना त्रास देण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर तातडीने दंडात्मक कारवाई करून फौजदारी गुन्हे नोंद करावी व या रस्त्यावर "ना- फेरीवाला क्षेत्र" घोषित करण्याबाबत गेली 8 महिने मागणी करून हि अनधिकृत फेरीवाले ना पाठिशी घालण्याचे काम हे अधिकारी करत आहेत.

नालासोपारा (प) मध्ये अनधिकृत बांधकाम करून सामान्य नागरीकांची आर्थिक फसवणुक केल्यामुळे अनेक कुटूंबे उध्वस्त होण्याची शक्यता आहे. याबाबत कारवाई करण्याबाबत तीन महिन्यांपासून पत्र व्यवहार करून पाठपुरावा करत आहे. प्रभाग समिती ई चे सहाय्यक आयुक्त व अधिकारी हे जाणिवपूर्वक खोटे बोलुन व अनधिकृत बांधकामांना पाठिशी घालण्याचे काम करत आहे.
अनेक वेळा कारवाई करण्याचे आश्वासन देऊन प्रत्यक्षात कारवाई होत नसल्याने अशा खोट्या भूलथापांना कंटाळून मी आमरण उपोषणास बोली आहे. 

जोपर्यंत अनधिकृत मोबाईल टॉवर बांधणारे व अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत माझे आमरण उपोषण सुरू राहिल माझ्या व माझ्या कार्यकर्त्यांचा जीवाचे काही बरेवाईट झाल्यास यास सर्वस्वी प्रभाग समिती ई जबाबदार असेल असे शिवसेना महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक यांनी सांगितले
यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख समीर गोलांबडे,  महिला आघाडी शहर संघटक वंशिका नर, महिला आघाडी उपशहरप्रमुख सोनल ठाकुर, उपशहरप्रमुख आनंद नगरकर, उपशहरप्रमुख महेश निकम, विभागप्रमुख किरण काळे, उपविभाग प्रमुख सचिन परब  उपस्थित होते....

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...