Wednesday 1 March 2023

सरकार कटकट गेट येथील नागरिकांच्या पाठीशी - संजय केनेकर

सरकार कटकट गेट येथील नागरिकांच्या पाठीशी - संजय केनेकर

एकही घराला धक्का लावू देणार नाही... जोपर्यंत येथील नागरिकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही...

छत्रपती संभाजीनगर, अखलाख देशमुख‌, दि १ : कटकट गेट येथील 22 एकर जमीन एनिमि प्राॅपर्टी म्हणून घोषित झाल्यानंतर खळबळ उडाली. येथील पाच हजार घरांवर बुलडोझर चालणार अशा बातम्या वर्तमानपत्रात छापून आल्यावर येथील नागरिकांची झोप उडाली. नेहमी गरीबांच्या हक्कासाठी आवाज उठवणारे भाजपाचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांना हि माहिती मिळाल्यानंतर तेही अस्वस्थ झाले. त्यांनी याबाबत तातडीने माहिती मिळवली. कटकट गेट येथील नागरिकांनीही त्यांच्याशी संपर्क करुन कशा प्रकारे महसूल प्रशासन अन्याय करुन हा निर्णय घेण्यात आला व येथील बाधितांना कोणतीही माहिती न देता सातबारा व पिआर कार्डवर सरकार नाव लावण्यात आले. 

मंगळवारी साठेआठ वाजता संजय केनेकर यांनी कटकट गेट येथील नागरिकांना दिलासा देण्यासाठी भेट घेतली. या विषयावर सरकार आपल्या पाठीशी आहे. एकही घर तोडू देणार नाही. येथील नागरिकांना त्यांनी शब्द दिला जोपर्यंत येथील नागरिकांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. सरकार कटकट गेट येथील नागरिकांच्या पाठीशी आहे. ज्या अधिका-यांनी या प्रकरणात चुकीचे निर्णय घेतले त्यांची चौकशी करून निर्णय मागे घेण्यास भाग पाडू. त्यांनी यावेळी आपल्या भाषणात विनंती केली कोणीही या प्रकरणात राजकारण करु नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी स्वतः चर्चा करून न्याय मिळवून देईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशीही चर्चा करणार असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. त्यांनी यावेळी सांगितले शहरात 60 टक्के वस्त्या बेकायदेशीर आहे गुंठेवारी कायदा यासाठी आणून शहरातील नागरिकांना आपली मालमत्ता कायदेशीर करण्यासाठी सवलत झाली आहे. शहरात काही वस्त्यावर हटवण्यासाठी प्रयत्न झाले पण त्यांना यश मिळाले नाही. म्हणून येथील नागरिकांनी धीर धरावा घाबरण्याचे कारण नाही मी तुमच्यासोबत आहे. अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी येथील नागरिकांना कसा न्याय मिळवून देता येईल याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर भाजपा अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष हाजी एजाज देशमुख, अभ्यासक राजेंद्र दाते पाटील, शेख सलीम सहारा, सय्यद अब्दुल रऊफ, पत्रकार विकार अहेमद, आझाद युवा ब्रिगेडचे मोबीन अन्सारी,  इंजिनिअर अब्दुल वहीद यांनी स्वागत करत प्रस्तावना केली. यावेळी शेख वहीद, मुजफ्फर इस्लाम, सय्यद अतिक, सय्यद जावेद अली व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...