भिंडीतील अंजुर फाटा उप वाहतूक शाखेने रहदारीस अडथळा ठरणारी रस्त्यावरील माती, खडी हटवली !
भिवंडी, दीं,५, अरुण पाटील (कोपर) :
भिवंडीतील सर्वात व्यस्त असलेला व नेहमी वाहतूक कोंडी होत असलेल्या अंजूर फाटा ते कशेळी या रस्त्यावरील राहानाळ गाव येथील रस्त्याच्या दुतर्फा पडलेल्या वाळू, खडी, माती मुळे या ठिकाणी नेहमी वाहतूक कोंडी होत असते, त्यामुळे आज रविवार दिं ५/२/२०२३ रोजी नारपोली उप वाहतूक शाखा अंजूर फाटा शाखेच्या वतीने दुतर्फा जम झालेली माती, खडी जे. सी. बी.च्या सहाय्याने बाजूला हटवण्यात आली आहे. त्यामुळे आता वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सदर कामगिरी ही नारपोली अंजूर फाटा उप वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. श्रीकांत सोंडे यांच्या सूचनेुसार व सहाय्यक पोलीस नरीक्षक श्री.सोमनाथ कर्णवर/पाटील यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हवालदार राहुल जाधव व पोलीस हवालदार दिलीप मोरे यांनी काम फत्ते केले.त्यामुळे आता वाहतूक कोंडी कमी होणार आहे.जर अश्याच प्रकारे अंजूर फाटा ते कशेळी गाव या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा पडलेली माती, खडी, बाजूला हटवली किंवा तेथून उचलली तर बऱ्यापैकी वाहतूक कोंडी कमी होऊन वाहन चालकांना त्याचा त्रास कमी होइल. त्यामुळे आता वाहतूकोंडी संदर्भात विविध उपाय योजना राबवाव्यात अशी अपेक्षा कोपर गावचे सरपंच श्री. हेमंत घरत यांनी व्यक्त केली आहे.
No comments:
Post a Comment