Sunday, 19 February 2023

शिवसेना औरंगाबादतर्फे सोमवारी भव्य मेळावा !'मेळावा निष्ठावतांचा, एकनिष्ठ शिवसैनिकांचा'

शिवसेना औरंगाबादतर्फे सोमवारी भव्य मेळावा !

'मेळावा निष्ठावतांचा, एकनिष्ठ शिवसैनिकांचा'

औरंगाबाद, अखलाख देशमुख, : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) औरंगाबादतर्फे सोमवार, २० रोजी भव्य मेळाव्याचे आयोजन केले आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली 'मेळावा निष्ठावतांचा, एकनिष्ठ शिवसैनिकांचा' हा मेळावा संत एकनाथ रंगमंदिर सायंकाळी  ४ वाजता होणार आहे.
यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, शिवसेना मराठवाडा सचिव ऍड. अशोक पटवर्धन, सहसंपर्कप्रमुख त्र्यंबक तुपे, आमदार डॉ. मनिषा कायंदे, आमदार उदयसिंग राजपूत, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, राजेंद्र राठोड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या मेळावा निष्ठावतांचा, एकनिष्ठ शिवसैनिकांचा' या मेळाव्यास सर्व शिवसेना पदाधिकारी आणि शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, भारतीय कामगार सेना, शिक्षक सेना, वाहतूक सेना, एसटी सेना, दलित आघाडी, सर्व अंगीकृत संघटना, आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी महापौर नंदकुमार घोडेले, भारतीय कामगार सेनेचे चिटणीस प्रभाकर मते पाटील, उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, गणू पांडे, आनंद तांदूळवाडीकर, संतोष जेजुरकर, राजेंद्र राठोड, बाप्पा दळवी, विधानसभा संघटक गोपाळ कुलकर्णी, राजू वैद्य, सुशील खेडकर, अक्षय खेडकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, विजय वाघचौरे, ज्ञानेश्वर डांगे, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, जिल्हा युवाधिकारी हनुमान शिंदे, महिला आघाडीच्या संपर्क संघटक सुनीता आऊलवार, सहसंपर्कसंघटक सुनीता देव, जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, जिल्हा समन्वयक माजी महापौर कला ओझा, जिल्हा युवती अधिकारी सानिका देवराज, युवासेना शहर अधिकारी सागर खरगे, स्वप्नील दिंडोरे, रामेश्वर कोरडे, आदित्य दहिवाल यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

शिवसेना शाखा क्रमांक ६६ (उ.बा.ठा) तर्फे लता गोपीनाथ शिंदे (वय-७६ वर्ष) या आजीला सहारा !!

शिवसेना शाखा क्रमांक ६६ (उ.बा.ठा) तर्फे लता गोपीनाथ शिंदे (वय-७६ वर्ष) या आजीला सहारा !! मुंबई (शांताराम गुडेकर) :           शिव...