Sunday 19 February 2023

शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे मारेकरी यांना शिक्षा करा ..भाकप चे राज्यभर जबाब दो आंदोलन

शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे मारेकरी यांना शिक्षा करा ..भाकप चे राज्यभर जबाब दो आंदोलन 
 

चोपडा, प्रतिनिधी.. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या त्याला २० फेब्रुवारी २३ रोजी सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. गोविंद पानसरे यांच्या जन्म १९३२ साली झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण एलएलबी पर्यंत झालेले होते. काही वर्षे कोल्हापूरच्या न्यायालयात त्यांनी वकीली केली होती नंतर त्यांच्या संपूर्ण आयुष्य सामाजिक राजकीय क्षेत्रात त्यांनी वाहून घेतले. 

तरुणपणापासून ते डाव्या विचारसरणीकडे वलले होते ते प्रकांडपंडित अभ्यासू नेते होते रस्त्यावरील टोल नाके विरुद्ध त्यांच्या लढा महाराष्ट्र वर्गातला होता. त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय समिती पासून राज्य कौन्सिल राज्य सचिवपर्यंत अनेक पदे त्यांनी भूषवली होती, महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला समजेल अशा तऱ्हेच्या त्यांनी पुस्तके पुस्तिका लिहिल्या छोटे छोटे पुस्तकांपासून तर मोठे मोठे ग्रंथ लेखन केले .त्यात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनावरील *शिवाजी कोण होता* हे पुस्तक त्यांनी २०११ सालि लिहिले व जनतेला खरे शिवाजी महाराज समजून सांगितले या पुस्तकाच्या महाराष्ट्रात नव्हे देशभर जगभर सतरा अठरा भाषांमध्ये ७५ आवृत्ती निघालेल्या आहेत छोटे खाणी पुस्तक वाचायला सोपे असून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य व विचारसरणी या पुस्तकात कॉ. पानसरे यांनी मांडलेली आहे. त्यांनी हेमंत करकरे यांच्या हत्येवर महाराष्ट्रात अनेक व्याखाने आयोजित केली होती. या दरम्यान १६ फेब्रुवारी २०१६ रोजी ते मॉर्निंग वॉकला गेलेले असता त्यांच्या आणि त्यांच्या पत्नी कॉ. उमा पानसरे यांचेवर जात्यांध विचाराच्या माथेफिरू लोकांनी  गोल्या झाडल्यात. त्यात कॉ. पानसरे यांचा २० फेब्रुवारी २०१६ रोजी त्यांना शहीद मरण आले, त्या पूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नेते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या मॉर्निंग मागच्या वेळीच करण्यात आली त्यांच्या मृत्यूच्या खटला गेल्या अनेक वर्षापासून सुरूच आहे अजून तो न्यायालयात उभा राहिलेला नाही.


म्हणून‌... शहीद गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी जवाब दो आंदोलन महाराष्ट्रात केले जात आहे  अशी माहिती जळगाव जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाने काढलेल्या पत्रकात देण्यात आली आहे .पत्रकात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्र हा‌ छ. शिवाजी महाराज, महात्मा फुले, आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील, गाडगे महाराज, संत तुकाराम, ..छ शाहू महाराज यांच्या पुरोगामी विचारांनी समृध्द असून सनातनी जातीवादी धर्मांध शक्ती याचा सुळसुळाट वाढला आहे, तेव्हा त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी व समाज घातक विचारणसर्णीला आळा घालावा अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष पुरोगामी संघटना अंधश्रद्धा निवारण समिती तसेच समविचारी पक्ष व संघटना करणार आहेत. या खटल्यांच्या प्रकरणी शासनाची दिरंगाई मुळे भारतीय कम्युनिस्ट पक्ष तर्फे महाराष्ट्रात २० फेब्रुवारी २०२३ रोजी जबाब दो आंदोलन करण्यात येत आहे असे पक्षाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकार भाकपचे जेष्ट नेते कॉ. अमृत महाजन, कॉ. लक्ष्मण शिंदे, ज्ञानेश्वर पाटील, जेडी ठाकरे, वाल्मीक मैराळे, वासुदेव कोळी, गोरख वानखेडे, छोटू पाटील, शांताराम पाटील, एकनाथ माळी तसेच डॉक्टर अय्युब पिंजारी, लालचंद नागदेव, भरत गुजर आदींनी प्रसिद्ध केले आहे.

No comments:

Post a Comment

येणा-या काळात संगमेश्वर येथे ९ गाड्यांच्या थांब्याबद्दल‌कोकण रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न आल्यास येत्या १५ ऑगस्टला करणार उपोषण !!

येणा-या काळात संगमेश्वर येथे ९ गाड्यांच्या थांब्याबद्दल‌कोकण रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न आल्यास येत्या १५ ऑगस्टला करणार उपोषण  ...