Friday 3 March 2023

43 लाखांची लाच मागणारा सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यकारी अभियंता साडेतीन लाख घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात !

43 लाखांची लाच मागणारा सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यकारी अभियंता साडेतीन लाख घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात !
जळगाव, प्रतिनिधी : शहादा येथे केलेल्या कामाची बिले मिळणे व नवीन कामांची कार्यारंभ आदेश काढण्यासाठी तब्बल ४३ लाखांची लाच मागितली गेली. त्यापैकी साडेतीन लाख रुपयांची लाच घेताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) कार्यकारी अभियंता महेश पाटील यांना सापळा रचून लाच लुपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश प्रतापराव पाटील (वय ५१, मुळ रा. नाशिक) असे त्याचे नाव आहे. 

तक्रारदार हे शासकीय नोंदणीकृत बांधकाम ठेकेदार आहेत. त्यांनी गेल्या सहा महिने ते एक वर्षाच्या कालावधीत नंदूरबार जिल्ह्यात प्रमुख जिल्हा मार्ग, प्रमुख राज्य मार्ग अशा विविध रस्त्यांच्या नवीन डांबरीकरणाची व डागडुजीची कामे पूर्ण केली आहेत. तसेच सध्याच्या कालावधीत तक्रारदार यांच्या तीन नवीन कामांच्या निविदा मंजूर होऊन त्यांचे कार्यारंभ आदेश धुळे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी शहादा कार्यालयात पाठविले होते, तरीही महेश पाटील हे कार्यारंभ आदेश काढत नव्हते.

तकारदार यांनी पूर्ण केलेल्या कामांबाबतची ३ कोटी ९२ लाख ७९ हजार २८५ रुपयांची एवढी बिलाची प्रलंबित रक्कम काढणे व या व्यतिरिक्त प्रस्तावित असलेल्या तीन कामांचे ५ कोटी ३३ लाख रुपये एवढ्या कामाच्या रक्कमेचे कार्यारंभ आदेश काढावेत, यासाठी त्यांनी महेश पाटील यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. तेव्हा त्यांनी बिले काढण्यासाठी १० टक्के तर तिन्ही कार्यारंभ आदेश देण्यासाठी ०.७५ ते १ टक्का अशा टक्केवारीच्या स्वरुपात एकत्रित ४३ लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी याची तक्रार नाशिक लाच लुपचत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार तक्रारीची पडताळणी केली असता त्यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे -वालावलकर,
अपर पोलीस अधीक्षक एन. एस. न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान वाघ, माधवी वाघ, पोलीस हवालदार विलास पाटील, विजय ठाकरे, देवराम गावित, अमोल मराठे, ज्योती पाटील, मनोज अहिरे, संदीप नावाडेकर, जितेंद्र महाले या पथकाने शहादा येथील पाटील याच्या शासकीय निवासस्थानी सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून साडेतीन लाख रुपये स्वीकारताना महेश पाटील याला पकडण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

सोमवारी चिपळूण येथे 'राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार' यांची जाहीर सभा !!

सोमवारी चिपळूण येथे 'राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार' यांची जाहीर सभा !! ** प्रशांत यादव यांची शरद पवार गट तर्फे विधानसभासाठी अधि...