Friday 3 March 2023

सोयगाव आगारातून सोयगाव ते छत्रपती संभाजीनगर फलक लावून पाच बसेस रवाना ; तिकिटातही मिळणार छत्रपती संभाजीनगर नाव !

सोयगाव आगारातून सोयगाव ते छत्रपती संभाजीनगर फलक लावून पाच बसेस रवाना ; तिकिटातही मिळणार छत्रपती संभाजीनगर नाव !

सोयगाव ते छत्रपती संभाजीनगर फलक लावून बस रवाना करताना 

सोयगाव, दिलीप शिंदे, दि.०३... जिल्ह्याचेऔरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर होताच शुक्रवारी एका पाठोपाठ एक अशा तब्बल पाच बसेस छत्रपती संभाजीनगर फलक लावून रवाना झाल्या असून त्यातील तीन बसेस छत्रपती संभाजीनगर ला थेट मुक्कामी रवाना झाल्या त्यामुळे जिल्ह्याचे नाव आता छत्रपती संभाजीनगर झाले असून सोयगाव आगाराच्या बसमध्ये  प्रवाशांना आता छत्रपती संभाजीनगर नावाचे तिकीटही शुक्रवरपासून उपलब्ध झाले आहे.

                                 चालक वाहक व इतर
    
सोयगाव आगाराने (दि.०३) सोयगाव वरून छत्रपती संभाजीनगर कडे जाणाऱ्या सर्व बसला छत्रपती संभाजीनगर फलक लावून रवाना केले आहे त्यामुळे जिल्ह्याचे नामांतर होताच प्रशासकीय पातळीवर परिवहन विभागाने आता बदल केला आहे सोयगाव बस स्थानकात बस फेऱ्याच्या वेळापत्रका मध्येही औरंगाबाद ऐवजी आता छत्रपती संभाजीनगर असा नवीन बदल केला आहे तर सोयगाव बस स्थानकाच्या नावासमोर जिल्हा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला त्यामुळे सोयगाव आगारचा कारभार आता छत्रपती संभाजीनगर नांवाने सुरू झाला असून जिल्ह्यात सोयगाव आगाराने छत्रपती संभाजीनगर नावाच्या फलकांनी बसेस रवाना केल्या आहे यावेळी पहिली बस रवाना होतांना दिलीप शिंदे, योगेश बोखारे, संदीप इंगळे आदींनी वाहक दिनेश पाखरे, चालक दिनकर लव्हतें, वाहतूक नियंत्रक सुरेश घोडेस्वार आदींचा सत्कार केला.

No comments:

Post a Comment

सोमवारी चिपळूण येथे 'राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार' यांची जाहीर सभा !!

सोमवारी चिपळूण येथे 'राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार' यांची जाहीर सभा !! ** प्रशांत यादव यांची शरद पवार गट तर्फे विधानसभासाठी अधि...