Friday 3 March 2023

जामनेर शहरातील राजे छत्रपती शिवाजी महाराज नगर फलक अनावरण विषय लवकर मार्गी लावावा - युवासेना

जामनेर शहरातील राजे छत्रपती शिवाजी महाराज नगर फलक अनावरण विषय लवकर मार्गी लावावा- युवासेना 

उपजिल्हाप्रमुख व वंदन मातृभूमी प्रतिष्ठाणचे - राहुल चव्हाण यांचे निवेदन

जामनेर, दिलीप शिंदे, दि. 3 -
     आज रोजी जामनेर शहरातील जळगाव रोड वरील 'शिवाजी नगर' भागाचे नाव "राजे छत्रपती शिवाजी महाराज नगर" हे करण्यात आलेले आहे. परंतु अद्याप ही दुरुस्ती झालेल्या नामकरणाचे फलक (बोर्ड) त्या ठिकाणी लावलेले नाही. नगरपालिका सांगण्यानुसार त्यांनी 28-11-2022 रोजी ठराव पास केलेला होता.पण "इतका वेळ कुठं पाणी मुरलं कळलं नाही.
      त्यानंतर 07-02-2023 रोजी "वंदन मातृभूमी प्रतिष्ठाण" च्या माध्यमातून नगरपरिषद ला निवेदन देण्यात आले. ते निवेदन दिल्यामुळे नगरपरिषद मार्फत 15 फेब्रुवारी रोजी तो 'ठराव प्रसिद्ध' करण्यात आला. 
   यामुळे 19 फेब्रुवारी रोजी "छत्रपती शिवाजी महाराज जयंती च्या निमित्ताने हे फलक अनावरण करण्यात येईल.परंतु अध्यापही ते "फलक अनावरण" झालेले नाही.
   त्यामुळे युवासेना उपजिल्हाप्रमुख व वंदन मातृभूमी प्रतिष्ठाणचे राहुल चव्हाण यांनी 8 दिवसाचा वेळ हा नगरपरिषद, तहसील कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना दिलेला आहे. 8 दिवसांत नामकरणाचा फलक (बोर्ड) या ठिकाणी नाही लागला. तर जामनेर नगरपालिका कडे निधी उपलब्ध नाही त्यांच्याकडील निधी संपलेला आहे व इतकं छोटं आणि अत्यंत महत्वाचे काम अनेक दिवसापासून ठरवून प्रलंबित आहे.असं समजून आम्ही सर्व "शिवप्रेमी व शिवभक्तांच्या सहकार्यातून शहरात देणगी मागून हे नामकरण फलक" (बोर्ड) या ठिकाणी उभं केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा "वंदन मातृभूमी प्रतिष्ठाण" चे राहुल भाऊ चव्हाण यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे......

No comments:

Post a Comment

सोमवारी चिपळूण येथे 'राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार' यांची जाहीर सभा !!

सोमवारी चिपळूण येथे 'राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार' यांची जाहीर सभा !! ** प्रशांत यादव यांची शरद पवार गट तर्फे विधानसभासाठी अधि...