Friday 3 March 2023

कोकण युवा सेवा संस्था ( रजि.) तर्फे क्रिकेटच्या सामन्याला उत्स्फूर्त प्रतिसाद !

कोकण युवा सेवा संस्था ( रजि.) तर्फे क्रिकेटच्या सामन्याला उत्स्फूर्त प्रतिसाद !

मुंबई, प्रतिनिधी - कोकण युवा सेवा संस्था (रजि.) आयोजित "कोकण युवा चषक २०२३" पर्व -१ ले हा पहिलाच उपक्रम उपरोक्त संस्थेच्या वतीने नुकताच संपन्न झाला. एकूण ३२ संघांनी ह्या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता.

स्पर्धेला जनार्दन पाटील (मामा) पालघर जिल्हा संघटक (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), विरार शहरप्रमुख - उदय दादा जाधव, शिवसेना वाहतूक सेना चे उपशहर प्रमुख- प्रशांत घाग, चंदनसारचे शाखाप्रमुख-सुशांत घाग, नालासोपारा नगीनदास पाडा शाखा क्र.४७ चे उपशाखा प्रमुख- भावेश खेडेकर, युवासेनेचे नितेश पाटील, पवन नारकर व कुणबी युवक मंडळ तालुका म्हसळा (मुंबई) युवा सहसचिव- महेंद्र घडशी यांच्या उपस्थितीत खऱ्या अर्थाने या क्रिकेट सामन्याला रंगत आली. सदर मान्यवरांचे "कोकण युवा सेवा संस्थेचे संस्थापक / अध्यक्ष अभिजीत कोटकर यांनी स्वागत केले.

ह्या उपक्रमात द्वितीय पारितोषिक जनार्दन पाटील (मामा) व प्रथम, द्वितीय तृतीय व चतुर्थ क्रमांक ट्रॉफी संजय मेहरा आणि
मालिकवीर, उत्कृष्ट फलंदाज व उत्कृष्ट गोलंदाज या ट्रॉफी कमलेश खेडेकर यांनी दिल्या.

ह्या पहिल्या वहिल्या "कोकण युवा चषक २०२३" पहिल्या क्रमांक चे मानकरी ठरला "रफ अँड टफ संघ" तर दुसरा क्रमांक - "मुरलीधर स्टार संघ", तसेच तिसरा क्रमांक - "आनंदी ११ संघ" व चौथा क्रमांक - "श्री साई ११ संघ" व मालिकवीर - रफ अँड टफ संघाचे विशाल, उत्कृष्ट फलंदाज - मुरलीधर स्टार संघाचे विशाल आणि उत्कृष्ट गोलंदाज - मुरलीधर स्टार संघाचे अभिषेक यांचे अभिनंदन सह पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या, संस्थेचे सदस्य रोमन जांभळे यांच्या संघाने पंचांची व स्कोरची कामगिरी उत्तमरीत्या सांभाळली. 

कोकण युवा सेवा संस्थेचे संस्थापक /अध्यक्ष - अभिजीत कोटकर, उपाध्यक्ष - अक्षय भालेकर, सचिव - तृशांत पवार, खजिनदार - संजना बेंद्रे मॅडम कार्यकारणी सदस्य वैभव पवार, पालघर जिल्हाध्यक्ष -सुशांत घाग, सदस्य - विजय आग्रे, अनिल गावडे, सुभाष इसवलकर, मनोज पिंपळकर, कमलेश खेडेकर, अक्षय खेडेकर, संतोष महाडिक, प्रदीप बोरे, सिद्धेश तावडे, रोमन जांभळे, वृनव जांभळे, वृद्रांश जांभळे यांच्या विशेष सहकार्याने उत्तम नियोजनात सदर क्रिकेट सामने यशस्वीपणे पार पडले.

1 comment:

सोमवारी चिपळूण येथे 'राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार' यांची जाहीर सभा !!

सोमवारी चिपळूण येथे 'राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार' यांची जाहीर सभा !! ** प्रशांत यादव यांची शरद पवार गट तर्फे विधानसभासाठी अधि...