Saturday 4 March 2023

तहसीलदांरानी शेतकरी नसल्याचा निर्णय दिल्यानंतर ही बोगस दाखला जोडून खरेदी केलेल्या जमीनीचा फेरफार मंडळ अधिकां-याकडू नोंद ? माझी पोलीस पाटलांची तक्रार !

तहसीलदांरानी शेतकरी नसल्याचा निर्णय दिल्यानंतर ही बोगस दाखला जोडून खरेदी केलेल्या जमीनीचा फेरफार मंडळ अधिकां-याकडू नोंद ? माझी पोलीस पाटलांची तक्रार !

कल्याण, (संजय कांबळे) : शेतकरी नसताना कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंचायत हद्दीतील शेकडो एकर जागा विकत घेणाऱ्या विरोधात गावातील खरे शेतकरी कल्याण तहसीलदार यांच्या कडे तक्रार करतात, या दाव्याच्या सुनावणीत तहसीलदार शहानिशा करून संबंधित खरेदीदार हे शेतकरी नसल्याचा निर्णय देतात, पण तरीही ही जागा सरकार जमा न होता, दुसराच व्यक्ती ती खरेदी खताने विकत घेतो. आणि आपले मंडळ अधिकारी महाशय हा फेरफार खुशाल नोंदवून मोकळे होतात? याला काय म्हणावे, त्यामुळे या सगळ्या प्रकाराची चौकशी करून हा फेरफार रद्द करावा. शिवाय या महसूल कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील माझी पोलीस पाटील संजय भोईर यांनी कल्याण तहसीलदार जयराज देशमुख यांच्या कडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, कांबा ग्रामपंचायत हद्दीतील स न १२५ हा सावकार विष्णू फडके यांच्या कडून शहा व इतर मंडळीनी खरेदी खताने विकत घेतला ३९२७, याची फेरफार नोंद होण्यासाठी शहा व इतर यांनी तलाठी व मंडल अधिकारी यांच्या कडे सन १९९३,९४,९७ मध्ये अर्ज केला,पण हे शेतकरी नसल्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळला. यामुळे शहा व इतर यांनी मौजे आरज ता मिरज येथील शेतकरी असल्याचा पुरावा जोडला आणि तलाठी व मंडल अधिकारी यांना हाताशी धरून फेरफार नोंदवला. परंतु ही बाब येथील शेतकऱ्यांच्या लक्षात येताच कल्याण तहसीलदार यांच्याकडे १/२०१५ हा दावा दाखल केला.

यानंतर तहसीलदार यांनी या प्रकरणात शहानिशा करून शहा हे शेतकरी नसल्याचा निर्णय २० जानेवारी २०१६ रोजी दिला. परंतु ही जागा सरकार जमा न होता सन २०२१ रोजी थावरदास चंदुलाल रोहरा व महेश पहलाराज सुखरामानी यांनी सन १२५ हा शहा व इतर यांच्या कडून खरेदी केला. खरेदीखतानुसार तलाठी शहाड व मंडल अधिकारी यांनी फेरफार ३९२७ नोंद केली.

मुळातच तहसीलदार कल्याण यांनी २०१६ साली शहा व इतर हे शेतकरी नाहीत, सर्व्हे नं १२५ हा ८४ क नुसार पात्र ठरविला असताना फेरफार ३९२७ ची नोंद कशी केली. हा प्रश्न उपस्थित करून हा फेरफार रद्द करण्यात यावा शिवाय तलाठी व मंडल अधिकारी यांच्या वर कडक कारवाई करावी अशी लेखी तक्रार कांबा पावशेपाडा येथील माझी पोलीस पाटील संजय जनार्दन भोईर यांनी कल्याण तहसीलदार जयराज देशमुख यांच्या कडे केली आहे.

No comments:

Post a Comment

संत निरंकारी मिशनचा महिला संत समागम भक्तिमय वातावरणात संपन्न !!

संत निरंकारी मिशनचा महिला संत समागम भक्तिमय वातावरणात संपन्न !! गंगाधाम, मार्केटयार्ड  22 सप्टेंबर २०२४ : निरंकारी सद्गुरु माता ...