Wednesday 1 March 2023

'मराठी भाषेचे स्वरूप व कार्य' या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न !

'मराठी भाषेचे स्वरूप व कार्य' या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न !

जव्हार, जितेंद्र मोरघा -

           कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मोखाडा येथे 'मराठी भाषा गौरव दिन' सोहळा निमित्त मराठी  विभाग व IQAC विभाग आयोजित,'मराठी भाषेचे स्वरूप व कार्य' या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. चंद्रशेखर घुगे व भीमराज पगारे ( एच.पी.टी.आर्ट अँड आर. वाय. के. सायन्स कॉलेज नाशिक) हे होते. यावेळी प्रा. डॉ. चंद्रशेखर घुगे यांनी 'मराठी भाषेचे स्वरूप व कार्य' या विषयावर बोलतांना म्हणाले, भाषेतील शब्दांचे  भांडवल  वाढविले पाहिजे, भाषा हे अभिव्यक्तीचे साधन आहे, मराठी साहित्यातील प्रवाह, कालखंडानुसार भाषा ही सतत बदलत असते त्यासाठी १३ व्या शतकापासून तर आधुनिक कालखंडातील भाषेतील  संदर्भ देऊन 'मराठी भाषेचे स्वरूप व कार्य' विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या आणि  साध्या भाषेत मार्गदर्शन केले. प्रा. भीमराज पगारे यांनी ही यावेळी पीजीन आणि क्रिऑल भाषेविषयी मत व्यक्त केले. कार्यशाळेचे अध्यक्ष  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. डी. भोर  यांनी आपल्या बोलीभाषेतील शब्द भांडार आणि व्यावहारिक भाषेचे ज्ञान वाढविण्यासाठी वाचन, चिंतन मनन वाढविले पाहिजे तर आपले संवाद कौशल्ये आत्मसात करण्यास मदत होईल. शेवटी ते म्हणाले, भाषेबरोबरच वाचन हा घटक खूप महत्वाचा आहे.म्हणून विद्यार्थ्यांनी दररोज वाचन करायला हवे असे आव्हान देखील विद्यार्थ्यांना केले. 
      कार्यशाळेचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. आर. डी. घाटाळ यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. के. के. पारधी  यांनी केले. कार्यशाळेसाठी महविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

बोंड्ये गावच्या माजी सरपंच ललिता गुडेकर यांना मातृशोक; मातोश्री वासंती गुडेकर यांचे निधन !!

बोंड्ये गावच्या माजी सरपंच ललिता गुडेकर यांना मातृशोक; मातोश्री वासंती गुडेकर यांचे निधन !! मुंबई (उत्कर्ष एस. गुडेकर) :        ...