Wednesday 1 March 2023

कटकट गेट येथील नागरिकांनी घाबरून जाऊ नये... तुमच्या घरावर बुलडोझर चालू देणार नाही - खा.इम्तियाज जलिल

कटकट गेट येथील नागरिकांनी घाबरून जाऊ नये... तुमच्या घरावर बुलडोझर चालू देणार नाही - खा.इम्तियाज जलिल 

कटकट गेट येथील नागरिकांना खासदार इम्तियाज जलील  यांनी भेट देवून दिले आश्वासन...

शहरातील कटकट गेट येथील 22 एकर 22 गुंठे जमीन एनिमि प्राॅपर्टी म्हणून घोषित करण्यात आली. यामुळे येथील नागरीक हवालदिल झाले आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी खासदार इम्तियाज जलील यांनी बाबर काॅलनी येथे बाधित नागरीकांना दिलासा दिला. मी तुमचा मुलगा व भाऊ आहे मी पण हे ऐकून अस्वस्थ झालो आहे. मी तुमच्या सोबत आहे. उद्या जिल्हाधिकारी सोबत बैठक घेऊन मी या प्रकरणाची माहिती घेणार आहे. येथील येथे नागरिक मागील 50 वर्षांपासून घर बांधून राहतात. त्यांच्याकडे एन.ए., रजिस्ट्री, पिआर कार्ड, शासनाकडे विविध कर भरलेले कागदपत्रे आहेत. अचानक त्यांच्या मालकी हक्क हिसकावून सातबारावर सरकार लावण्यात आले. याचा जाब प्रशासनाला विचारणार आहे. केंद्र सरकार एकीकडे पंतप्रधान आवास योजनेतून सर्वांना घरे देण्याची योजना राबवते. दुसरीकडे कायदेशीर रित्या राहत असलेल्या लोकांची घरे उद्ध्वस्त करण्याचा डाव आखला जात आहे. हे खपवून घेणार नाही. न्यायालयीन व रस्त्यावरील लढाई आम्ही लढू पण कोणालाही बेघर होऊ देणार नाही. असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेवून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल असा विश्वास बैठकीत त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी शेख सलीम सहारा, जहाँगीर खान ऊर्फ अज्जू पहेलवान, रफीक पालोदकर व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

वृत्तांकन‌ - अखलाख देशमुख 

No comments:

Post a Comment

बोंड्ये गावच्या माजी सरपंच ललिता गुडेकर यांना मातृशोक; मातोश्री वासंती गुडेकर यांचे निधन !!

बोंड्ये गावच्या माजी सरपंच ललिता गुडेकर यांना मातृशोक; मातोश्री वासंती गुडेकर यांचे निधन !! मुंबई (उत्कर्ष एस. गुडेकर) :        ...