Wednesday 1 March 2023

शिवसेनेच्या दणक्याने वसई विरार महानगरपालिका प्रभाग समिती ई ला आली जाग....

शिवसेनेच्या दणक्याने वसई विरार महानगरपालिका प्रभाग समिती ई ला आली जाग....

*शिवसेना पक्षाच्या मागण्या मान्य लेखी आश्वासानंतर उपोषण मागे*

वसई, प्रतिनिधी : वसई विरार महानगरपालिकेचे अधिकारी बनसोडे याच्या उपस्थितीत व सहाय्यक आयुक्त निता कोरे यांनी दिलेल्या लेखी आश्वासानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

 
मान्य केलेल्या मागण्या....

नालासोपारातील (प) मधिल एकमेव स्मशानभूमीत विद्युत शवदाहीनी चे काम 95% काम पुर्ण झाले असुन लवकरच 5% काम पुर्ण करून शवदाहिनी सुरू करण्यात येईल.

नालासोपारातील अनधिकृत बांधकामाबाबत   बांधकाम व्यवसायीकांवर MRTP  अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

अनधिकृत फेरीवाले यांच्यावर कारवाई करण्यात येईल व रहदारीस अडथळा असलेले अधिकृत फेरीवाले यांना स्थलांतरीत करण्यात येईल.

अनधिकृत मोबाईल टॉवर कारवाई करण्याबाबत कोर्टात प्रकरण सुरू असल्याने त्याबाबत कोर्टाचा निकाल येताच कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले.

नालासोपारा स्टेशन ला जाणारया ब्रीज खालील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवण्याबाबत आश्वासन देण्यात आले.

प्रशासनाने मान्य केलेल्या मागण्याचे यश व श्रेय हे सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आहे यासर्वांनी साथ व एकजुट दाखवुन मोठ्या संख्येने सर्व उपस्थित होते असे महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक यांनी सांगितले..
यावेळी पत्रकार बांधव तसेच शिवसेनेचे शहरप्रमुख समीर गोलांबडे, उपशहरप्रमुख श्रीकांत जाधव, महिला आघाडी संघटक उपशहरप्रमुख सोनल ठाकुर, महिला विभाग संघटक दिनीशा मोरे, उपशहरप्रमुख आनंद नगरकर, उपशहरप्रमुख महेश निकम, विभागप्रमुख प्रशांत टेलर, विभागप्रमुख विनोद साहनी, विभागप्रमुख किरण काळे, उपविभाग प्रमुख सचिन परब, युवाअधिकारी अजय राठोड, युवा शाखा अधिकारी सुजल रहाटे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते  उपस्थित होते....

No comments:

Post a Comment

पारस काव्य कला,जनजागृती संस्थेतर्फे विविध पुरस्कार, काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन !

पारस काव्य कला,जनजागृती संस्थेतर्फे विविध पुरस्कार, काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन ! मुंबई (शांताराम गुडेकर) :              सामाजिक, ...