Thursday, 30 March 2023

हॉटेल व्यावसायिकाची मुजोरी !

हॉटेल व्यावसायिकाची मुजोरी ! 

*महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांचे अभय असल्याची चर्चा*

कल्याण, नारायण सुरोशी : कल्याण शहरात स्टेशन जवळील दिपक हॉटेल मालकाची मुजोरी पहाण्यास मिळाली, एवढ्या मोठ्या कारवाई वेळी महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार समोर आला.

कल्याण स्टेशन परिसराच्या विकासाचे काम स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु आहे. हे हॉटल रस्त्याला लागूनच आहे.  या हॉटेलचे स्ट्रक्टरल ऑडीट करण्यासाठी महापालिकेने ऑडीट करण्याची नोटिस हॉटेल मालकास पाठविली. हॉटेल मालकाने महापालिकेचं पथक ऑडीटकरीता येणार त्या आधी एक दिवस हॉटेल बंद केलं आहे. आज महापालिकेतर्फे ऑडीट करण्यासाठी प्रभाग अधिकारी तुषार सोनावणे, महापालिका अधिकारी राजेश सावंत हे त्यांच्या पथकासह पोलीस बंदोबस्तात पोहोचले. त्याठिकाणी हॉटेल मालकाने ऑडीट करण्यास मज्जाव केला. महत्वाची बाब एवढी मोठी कारवाई व स्थानिक प्रभाग समितीचे उपायुक्त धैर्यशील जाधव गैरहजर, कारवाईसाठी गेलेले प्रभाग अधिकारी तुषार सोनवणे‌ एकटे पडल्याचे दिसून आले. महापालिका अधिकारी हॉटेल मालक यांच्यात बरीच चर्चा झाली, पण हॉटेल बंद असताना कारवाई करणे बेकायदेशीर असल्याचा दावा हॉटेल मालकाने केला. 

या आधी ही अनेकदा दिपक हॉटेलचा विषय कारवाई संदर्भात पुढे आला होता, या हॉटेल मुळे मोठ्या प्रमाणात वाहतूकीस अडथळा निर्माण होत असतो, तरी अजून पर्यंत कधीही याच्यावर कारवाई झालेली नाही.

 सर्वसामान्य नागरिकांत हीच चर्चा आहे. गरिबांसमोर धाडस दाखवणारे महापालिकेचे अधिकारी एका हॉटेल व्यवसाय का समोर किती लाचार आहेत हे याचे जिवंत उदाहरण हा प्रसंग दाखवून गेला, तसेच महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांचा सहकार्य शिवाय एक हॉटेल व्यावसायिक एवढी मुजोरी दाखवू शकत नाही. तरी प्रश्न रहातात या हॉटेलचे स्ट्रक्चरल ऑडीट (Structural Audit) होणार का ? आणि झालं तर ते कधी होणार ? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. महानगरपालिका या हॉटेल संदर्भात काही ठोस निर्णय घेऊ शकेल का?

दिपक हॉटेलचे मालक चंद्रकांत शेट्टी यांनी सांगितले, ही कारवाई बेकायदेशीर असून याआधी देखील मी पालिकेच्या पॅनेलवरील स्ट्रक्चरल ऑडिटरमार्फत स्ट्रक्चरल ऑडिटर केलं होतं. मात्र महापालिकेने त्यात त्रुटी काढल्या आहेत. विजेटीआयमार्फत ऑडिट करण्यासाठी आज ते आलेत मात्र हे सर्व बेकायदेशीर आहे. माझं हॉटेल बंद आहे. हॉटेलमध्ये कुलूप तोडून घुसणे बेकायदेशीर असल्याचं त्यांनी म्हटलं.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...