Thursday 30 March 2023

राम नवमी उत्सवात " शिर्डी " साईंच्या जयघोषाने दुमदुमली, भक्तांसाठी मंदिर रात्रभर खुले !

राम नवमी उत्सवात " शिर्डी " साईंच्या जयघोषाने दुमदुमली, भक्तांसाठी मंदिर रात्रभर खुले !

*श्री राम नवमी निमीत्त शिर्डीत श्री.साई बाबांची आरती, पूजन व मध्यांन आरती*

भिवंडी, दिं,३०, अरुण पाटील, (कोपर) :
            शिर्डीत दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. आज (दिं,३०) रामनवमी उत्सवात "शिर्डी" साईंच्या जय घोषानेने दुमदुमली असून आलेल्या सर्व साई भक्तांना दर्शन मिळावे या साठी साई संस्थानाने मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
             शिर्डीतील रामनवमी उत्सव सर्वांच्याच श्रध्देचा विषय आहे. शिर्डीमध्ये रामनवमी उत्सवाची बुधवारपासून भक्तीमय वातावरणात सुरूवात झाली आहे. साईनामाचा जयघोष करत मुंबईसह ईतर शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. उत्सवासाठी  " साईबाबा" मंदिरावर विद्युत रोशनाई तसेच "साई" मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. 
            शिर्डीत रामनवमी उत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. भाविकांनी कावडीतून आणलेल्या गोदावरीच्या पाण्याची विधीवत पुजा करून "साईमुर्ती" आणि "साई" समाधीला जलाभिषेक करण्यात आला. उत्सवाचे यंदाचे हे ११२ वे वर्ष आहे. "साईबाबांना" मंगलस्नानही कावडीतून आणलेल्या पाण्याने करण्यात आले आहे. सकाळी काकड आरतीनंतर बाबांची पोथी, विणा आणि प्रतीमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. 
           उत्सवाच्या निमित्ताने साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. साई मूर्तीलाही विविध अलंकारांनी सजविण्यात आले आहे. साई मंदिराच्या ४ नंबर प्रवेशद्वारावर द्वारकामाई मंडळाच्या वतीने भव्य श्रीराम प्रवेशद्वार उभारले आहे. लेंडीबागेत साई पालखी मिरवणूक व साई प्रसादालयाच्‍या प्रवेशद्वारावर शिव भोला भंडरी, साई भोला भंडारी हे भव्‍य देखावे उभारले आहेत.
         रामनवमी उत्सवात सहभागी होण्यासाठी देशभरातून भाविक येथे येत असतात. शिर्डीचा उत्सव हा भाविकांसाठी आनंद सोहळा असतो. साईबाबांच्या भेटीसाठी आतुर झालेला भक्तगण साई मुर्तीची केवळ एक झलक पाहाण्यासाठी उत्सुक असतो. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवातील उर्जा भाविकाला वर्षभर पुरणारी असते.हा उत्सव 'याची देहि याची डोळा' अनुभवण्यासाठी लाखोंच्या संख्येने भक्त "साई" दरबारी दाखल झाले आहेत.

No comments:

Post a Comment

मतदारसंघांतील गेल्या दहा वर्षातील महायुतीची विकासाची कामे जनतेपर्यंत पोहोचवा - श्रीकांत शिंदे

मतदारसंघांतील गेल्या दहा वर्षातील महायुतीची विकासाची कामे जनतेपर्यंत पोहोचवा - श्रीकांत शिंदे  डोंबिवली, सचिन बुटाला : कल्याण पू...