Thursday, 30 March 2023

मंचदिनी कीर्तन महोत्सवास कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांची सदिच्छा भेट !

मंचदिनी कीर्तन महोत्सवास कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांची सदिच्छा भेट ! 

सिल्लोड, अखलाख देशमुख‌, दि ३० : अंधारी ता. सिल्लोड येथील महंत श्री. अर्जुनदास महाराज यांच्या 93 व्या पुण्यतिथी निमित्त उदासी मठ येथे आयोजित भव्य मंचदिनी कीर्तन महोत्सवास कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थित भाविकांशी संवाद साधत मंत्री अब्दुल सत्तार यांनी आयोजित पंचदिनी कीर्तन महोत्सव व श्रीराम नवमीच्या उपस्थित भाविकांना शुभेच्छा दिल्या.

      यावेळी महंत मुकुंडदास महाराज, ह.भ.प. तुळशीराम महाराज काकडे , शिवसेना जिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत, माजी जि.प. उपाध्यक्ष केशवराव पा. तायडे , सिल्लोड न.प. तील शिवसेना गटनेता नंदकिशोर सहारे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, रवींद्र दाणी यांच्यासह अण्णा पांडव, अब्दुल रहीम, लक्ष्मण तायडे, जयवंता गोरे, विठ्ठल तायडे, डॉ. मुळे आदिंसह भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

नेमेचि येतो मग उन्हाळा, पर्यावरणाचा उमाळा !!

नेमेचि येतो मग उन्हाळा, पर्यावरणाचा उमाळा !! दरवर्षी उन्हाळ्यामध्ये उन्हाच्या झळा सहन करत पर्यावरणाच्या गप्पा मारतो. वृक्ष तोड आ...