Friday 3 March 2023

रोग हाल्याला इंजेक्शन पखालीला !

रोग हाल्याला इंजेक्शन पखालीला ! 

मुंबई, अखलाख देशमुख, दि ३ : एसटीच्या मोडक्या, तुटक्या बसवर राज्यशासनाची जाहिरात प्रसिद्ध केल्याप्रकरणी भूम एसटी आगाराच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई म्हणजे 'रोग हाल्याला, इंजेक्शन पखालीला' असा प्रकार आहे. संबंधित कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घ्यावं. राज्य शासनाकडून सुरु असलेली जाहीरातींवरची उधळपट्टी कमी व्हावी आणि तो निधी एसटीच्या आधुनिकीकरण, विकासकामांसाठी, सुधारणांसाठी, कर्मचाऱ्यांच्या हितासाठी खर्च व्हावा, अशी अपेक्षा होती. परंतु तसं काही घडलं नाही. कारवाई करायचीच असेल तर, ज्यांनी शासनात बसून जाहिरातीचं टेंडर काढलं. ज्यांनी मोडक्या एसटीवर जाहिरात दिली. मोडक्या एसटीवर जाहिरात दिल्याचं लक्षात येऊनही, पैशांचा अपव्यय होऊ दिला, त्यांच्यावर कारवाई करावी. एसटी महामंडळ आणि एसटीची प्रवासी सेवा हा महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आहे. ग्रामीण, दुर्गम भागात आजही एसटी हीच प्रवासाचं साधन आहे. एसटीचा वापर राजकारणासाठी न करता, महाराष्ट्राच्या विकासासाठी झाला पाहिजे.

No comments:

Post a Comment

सोमवारी चिपळूण येथे 'राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार' यांची जाहीर सभा !!

सोमवारी चिपळूण येथे 'राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार' यांची जाहीर सभा !! ** प्रशांत यादव यांची शरद पवार गट तर्फे विधानसभासाठी अधि...