Friday 3 March 2023

औरंगाबाद नामांतर विरोधात एकाच संघटनेचे दिड लाख हरकती दाखल... औरंगाबाद नाव बदलण्यास केला विरोध

औरंगाबाद नामांतर विरोधात एकाच संघटनेचे दिड लाख हरकती दाखल... औरंगाबाद नाव बदलण्यास केला विरोध

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ३ : औरंगाबाद नामांतर विरोधात आज दुपारी एकाच संघटनेने दिड लाख हरकती दाखल करुन औरंगाबाद विभाग, औरंगाबाद जिल्हा औरंगाबाद शहर, औरंगाबाद तालुक्याचे नामांतर करु नये या मागणीचे निवेदन विभागीय उपायुक्त मनियार यांना लेखी निवेदन सादर करुन नामांतराचा विरोध केला आहे. जमियतूल उलमाए हिंदने (अरशद मदनी) या संघटनेचे औरंगाबाद शहर व जिल्ह्यात दिड लाख सदस्य आहेत. या सदस्यांनी संघटनेचे पदाधिकारी निवडून दिले आहे. त्यांच्या वतीने कायदेशीर हरकती दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती संघटनेचे शहराध्यक्ष हाफिज अब्दुल अजीम यांनी उपायुक्त मनियार यांना दिली.

निवेदनात म्हटले आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे आदर करतो. औरंगाबाद हे ऐतिहासिक आहे. याची जगात ओळख आहे. औरंगजेब यांनी हे नांव ठेवलेले नाही तर त्यावेळचे नागरिकांनी हे नाव दिले आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना शहरातील विविध शासकीय कार्यालयात बोर्ड बदलले जात आहे याचा या संघटनेने विरोध केला. निवेदनावर शहराध्यक्ष हाफिज अब्दुल अजिम, सचिव मौलाना कैसर खान येती, कोषाध्यक्ष मुस्तफा खान, उपाध्यक्ष इब्राहिम पठाण, उपाध्यक्ष हाफिज इकबाल अन्सारी, मौलाना मो.युसुफ मिल्लि, सचिव हाफिज मो.इसा, सचिव अतिक पालोदकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

सोमवारी चिपळूण येथे 'राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार' यांची जाहीर सभा !!

सोमवारी चिपळूण येथे 'राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार' यांची जाहीर सभा !! ** प्रशांत यादव यांची शरद पवार गट तर्फे विधानसभासाठी अधि...