Friday, 3 March 2023

बेमुदत आमरण उपोषण करण्याचा प्रदिप वाघ यांचा इसारा !

बेमुदत आमरण उपोषण करण्याचा प्रदिप वाघ यांचा इसारा !

जव्हार, जितेंद्र मोरघा -

मोखाडा तालुक्यातील विविध समस्या सोडविण्यासाठी दि 9/3/2023 पासुन  पंचायत समिती मोखाडा येथे प्रदीप वाघ व त्यांचे सहकारी संजय हमरे, रमेश बोटे, नरेंद्र येले, दशरथ पाटील, नंदकुमार वाघ, निलेश झुगरे, निलेश ठोमरे, भरत बुधर यासह अनेक कार्यकर्ते उपोषण करणार आहेत. मोखाडा तालुक्यातील विकास कामांच्या मागण्यासाठी प्रदिप वाघ यांनी बेमुदत उपोषणाचा इसारा दिला आहे. या प्रमुख मागण्या
पाणी पुरवठा योजना, सायदे मारुतीवाडी धरणाची दुरुस्ती, आरोग्य सुविधा, आधार कार्ड केंद्र सुरू करणे, शालेय विद्यार्थ्यांना मोफत जातीचे प्रमाणपत्र मिळणे, जलजीवन मिशन योजने मुळे खोदकाम केलेले रस्ते पुर्ववत करणे. इत्यादी मागण्यांसाठी उपोषण करणार असल्याचे  प्रदीप वाघ यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

ठाण्यात हुक्का पार्लरवर धाड: 9 हजारांचा मुद्देमाल जप्त, चालकासह 14 जणांवर गुन्हा !!

ठाण्यात हुक्का पार्लरवर धाड: 9 हजारांचा मुद्देमाल जप्त, चालकासह 14 जणांवर गुन्हा !! *ठाणे, दि. 15 जून 2026* ठाण्यातील राबोडी पोल...