Monday 6 March 2023

जि.प. प्राथमिक शाळा कळंबट बौद्ध शाळेच्या विद्यार्थ्यांचे रत्नागिरी जिल्हा प्रज्ञाशोध आणि रत्नागिरीचा भास्कराचार्य परीक्षेत घवघवीत यश संपादन !

जि.प. प्राथमिक शाळा कळंबट बौद्ध शाळेच्या विद्यार्थ्यांचे रत्नागिरी जिल्हा प्रज्ञाशोध आणि रत्नागिरीचा भास्कराचार्य परीक्षेत घवघवीत यश संपादन !

मुंबई ( निलेश कोकमकर/शांताराम गुडेकर )

              चिपळूण तालुक्यातील दुर्गम भागात तथा निसर्गाच्या सांनिध्यात वसलेल्या कळंबट गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंबट बौद्ध या शाळेतील विद्यार्थ्यांनी प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी जिल्हा अतंर्गत रत्नागिरी प्रज्ञाशोध परीक्षा व रत्नागिरीचा भास्कराचार्य या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे.  
               रत्नागिरी प्रज्ञाशोध परीक्षेत केंद्रस्तर कळंबट मधून कुमारी. मिताली विजय घाणेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला व कुमार. तेजस रवींद्र गमरे याने द्वितीय क्रमांक पटकावला. त्याच बरोबर कुमार.अथर्व सूचित शिरकर याने प्रभाग वहाळ स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. कुमार. अथर्व शिरकर याचा फक्त २ टक्क्याने तालुक्यातून प्रथम क्रमांक हुकला नाहीत तर तो विद्यार्थी तालुक्यातून प्रथम आला असता. असे मुख्यध्यापक श्री. तांबडकर सर यांनी माहिती देताना सांगितले. तरी हि विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश खूप खूप मोलाचे आहे. या बद्दल तालुका स्तरातून आणि कळंबट गावातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री. यशवंत तांबडकर गुरुजी, वर्ग शिक्षक श्री. नितीन खामकर गुरुजी यांची मेहनत, शिक्षण प्रणालीमुळे जे यश प्राप्त झाले आणि शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांच देखील अभिनंदन होत आहे. त्याच बरोबर विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

मनसेचे प्रमोद गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन !

मनसेचे प्रमोद गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन ! कोकण - ( दिपक कारकर )  अल्पवधीत सामाजिक क्षेत्रा...