Tuesday, 24 September 2024

मनसेचे प्रमोद गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन !

मनसेचे प्रमोद गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन !

कोकण - ( दिपक कारकर ) 

अल्पवधीत सामाजिक क्षेत्रासोबत राजकीय वर्तळात आगळीक ओळख निर्माण करणारे, गुहागर विधानसभा मतदार संघाचे भावी आमदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते असे उद्योजक तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२६ सप्टेंबर २०२४ रोजी गुहागर मतदारसंघात विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली, अपरांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चिपळूण यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. 

या शिबिरात कान, नाक, घसा, डोळे, रक्त गट अशी मोफत आरोग्य तपासणी सह मोफत औषधे, मोफत चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा-मुंढर (शिरबाडवाडी) येथे गुरुवार दि.२६ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी ०२ वाजेपर्यंत ठेवण्यात आले आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी पुढील ७०२०४२१९०२ ह्या भ्रमणध्वनी वरती संपर्क साधावा असे आवाहन गुहागर मनसेच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

नालासोपारात मुदत संपलेल्या औषधे लेबल बदलून विक्री !

नालासोपारात मुदत संपलेल्या औषधे लेबल बदलून विक्री !  *शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्षाची कारवाई ची मागणी* नालासोपारा, प्रतिनिध...