Friday, 28 April 2023

2024 च्या मुख्यमंत्री राजगृह ठरवेल - प्रा नागोराव पांचाळ

2024 च्या  मुख्यमंत्री राजगृह ठरवेल - प्रा नागोराव पांचाळ

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २८ : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र भर ओबीसी संवाद दौरा आयोजित करण्यात येणार असून यानिमित्त आज औरंगाबाद वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ओबीसी संवाद मेळावा मौलाना आझाद संशोधन केंद्रात आयोजित करण्यात आला आहे. 

या ओबीसी मेळाव्याला संबोधित करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा नागोराव पांचाळ हे औरंगाबाद जिल्हा दौऱ्यावर आले असून त्यांची पत्रकार परिषद आज सुभेदारी विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती, यावेळी पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी ओबीसी जनगणना, मराठा आरक्षणावर सविस्तर मांडणी केली व पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट केली यावेळी वंचित बहुजन महिला आघाडी प्रदेश महासचिव तथा औरंगाबाद जिल्हा प्रभारी अरुंधती ताई शिरसाट यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील संघटनात्मक पातळीवर वंचित बहुजन आघाडीचे चालू असलेल्या ओबीसी समाज कश्या पद्धतीने जोडला जातो आहे याची सविस्तर मांडणी पत्रकार परिषदेत केली. 

यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश बन, जिल्हाध्यक्ष प्रभाकर मामा बकले, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, जिल्हा युवा महासचिव सतीश शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अँड लताताई बामणे,  जिल्हा महासचिव अँड पंकज बनसोडे, जिल्हा महासचिव संघराज धम्मकिर्ती, मिलिंद बोर्डे, महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव कोमल हिवाळे, युवा शहराध्यक्ष संदीप जाधव, अमृतराव डोगरदिवे, संकेत कांबळे, सिध्दार्थ मोरे, मनोहर जगताप, साडुं श्रीखंडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! घाटकोपर, ...