कृषिमंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आज अमरावती येथे विभागीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पार पडली !
अमरावती, अखलाख देशमुख :
शेतकऱ्यांसाठी आवश्यक खतांचा संरक्षित साठा तयार करण्यासह शेतकऱ्यांना बियाणे तसेच युरिया आणि डीएपी खतांचा तुटवडा भासणार नाही यादृष्टीने नियोजन करा असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीस कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त सुनील चव्हाण, विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी अमरावती विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment