Saturday 1 April 2023

मुंबई पुणे एक्सप्रेस वर अनेक ठिकाणी दुरुस्ती ची कामे पण तरीही' टोल, मध्ये भरमसाठ वाढ, शासनासह सर्व मुगगिळून गप्प ?

मुंबई पुणे एक्सप्रेस वर अनेक ठिकाणी दुरुस्ती ची कामे पण तरीही' टोल, मध्ये भरमसाठ वाढ, शासनासह सर्व मुगगिळून गप्प ?

कल्याण, (संजय कांबळे) : मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहरांना जोडणा-या एक्सप्रेस वेवर अनेक ठिकाणी दुरुस्ती ची कामे सुरू असताना दुसरीकडे या द्रुतगती महामार्गावरुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांच्या कडून घेतल्या जाणाऱ्या 'टोल, मध्ये मात्र भरमसाठ वाढ करण्यात आली असताना यावर शासन किंवा विरोधक मुगगिळून गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सध्या राज्यात जनता महागाने त्रासली आहे, घरगुती गँस,जीवनावश्यक वस्तू, पेट्रोल, डिझेल, सीएनजी, वाढती बेरोजगारी, नैसर्गिक आपत्ती व अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान, शेतकऱ्यांच्या मालाला न मिळणारा बाजारभाव, आदी मुळे जनता सत्ताधा-याना वैतागली आहे.

असे असतानाच आता मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर धावणाऱ्या वाहनाकडून मोठ्या प्रमाणात टोलवाढ करून त्याची वसुली केली जात आहे. वास्तविक पाहता मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग हा भारत देशातील सर्वात पहिला नियंत्रित प्रवेश महामार्ग असून २००२ साली हा महामार्ग बांधून पुर्ण झाला. 

९४.५ किमी लांबीचा महामार्ग आहे, तो दोन मोठया शहरांना जोडतो, या मार्गावरून दररोज लाखो छोटी मोठी वाहने प्रवास करतात. हा महामार्ग एकूण ६ लेनचा हा मार्ग असतांना जागोजागी दुरुस्ती ची कामे सुरू आहेत, तळेगाव, टोलनाका, भोगदा, खोपोली बायपास, यासह पुणे पासून ते कळंबोली पर्यंत अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवला आहे. यामुळे बहुतांश वेळा ३ लेनच्या जागी दोनच लेन सुरू ठेवल्या जातात, यातून महामार्गावर बऱ्याच वेळा अपघात घडले आहेत व घडत आहेत. 

असे असताना खरे म्हणजे टोल घ्यायला नको पण येथे उलटच घडत आहे, सध्या जवळपास १८ टक्के जुन्या व नव्या महामार्गावर टोल वाढविण्यात आला आहे. यामध्ये कारसाठी २४० रुपये च्या ऐवजी ३२० रुपये, ४९५, ६८५, ९४०' १६३०, २१६५ अशी भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. ट्रक, बस, कन्टेनर, अजून मोठी वाहने यांचा समावेश आहे. अगोदरच महागाने नागरिक हैराण झाले आहेत आणि महामार्गावर दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असताना ही टोलवाढ केली आहे. त्यामुळे संतापात भर पडली आहे.विशेष म्हणजे ऐवढे होऊनही शासनाचे मंत्री, आमदार, खासदार, किंवा विरोधक मुग गिळून गप्प बसले आहेत.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...