Friday 31 March 2023

कोचरी लघु पाटबंधारे योजना भूसंपादन व पुनवर्सनासंदर्भात जिल्हा स्तरावर संबंधित प्रशासनाने ग्रामस्थांसोबत बैठक घ्यावी - केतन भोज

कोचरी लघु पाटबंधारे योजना भूसंपादन व पुनवर्सनासंदर्भात जिल्हा स्तरावर संबंधित प्रशासनाने ग्रामस्थांसोबत बैठक घ्यावी - केतन भोज

लांजा, शांताराम गुडेकर ; गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या कोचरी लघु पाटबंधारे योजना कोचरी (डाफळेवाडी) या योजनेला सामजिक कार्यकर्ते केतन भोज यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर मुंजरी मिळाल्यानंतर या मृद व जलसंधारण विभागाच्या होऊ घातलेल्या लघु पाटबंधारे योजना कोचरी ( डाफळेवाडी ) या प्रकल्पामुळे कोचरी गावातील पाणी टंचाई दूर होण्यास मदतच होणार आहे तसेच या योजनेचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.परंतु या होऊ घातलेल्या योजनेमुळे त्याठिकाणी असलेल्या आजूबाजूच्या प्रकल्पग्रस्त होणाऱ्या वाड्या-वस्त्यांच्या पुनवर्सनासंदर्भात आणि प्रकल्पाच्या सद्य:स्थितीतबद्दल जिल्हा स्तरावर संबंधित प्रशासनाने प्रकल्पग्रस्त होणाऱ्या ग्रामस्थांसोबत बैठक घ्यावी अशी मागणी केतन भोज यांनी केली होती यामुळे येथील ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेऊन त्या बाबतीत प्रशासनाला तातडीने उपाययोजना करता येतील.तसेच भूसंपादनाच्या कार्यवाही मध्ये ही पारदर्शकता येईल, केतन भोज यांच्या या लेखी मागणी नंतर उपजिल्हाधिकारी ( भूसंपादन ) समन्वय, रत्नागिरी यांनी भोज यांना कळवले की लघु पाटबंधारे योजना कोचरी ता.लांजा जि.रत्नागिरी या योजनेच्या धरण तळ व बुडीत क्षेत्र, सांडवा,धरण पोहोच रस्ता या प्रयोजनासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी, राजापूर यांचेकडून भूसंपादनाची कार्यवाही सुरू असून, त्यांच्या कार्यालयाकडील पत्राने उपविभागीय अधिकारी, राजापूर यांचेकडे भूसंपादन प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय (भूसंपादन) समन्वय शाखा, रत्नागिरी यांनी पाठवला आहे या सदर भूसंपादनाची कार्यवाही प्राथमिक स्तरावर आहे त्यामुळे सामजिक कार्यकर्ते केतन भोज यांच्या लेखी मागणी नंतर उपविभागीय अधिकारी, राजापूर व जिल्हा जलसंधारण अधिकारी, रत्नागिरी यांना पुनवर्सनाशी निगडीत काही बाबी असल्यास त्या तपासून उचित कार्यवाही करण्याच्या सूचना उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) समन्वय, रत्नागिरी यांनी दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

महाआघाडीतील विसंवाद यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांचा विजय होणार मोठ्या मताधिक्याने !! कल्याण लोकसभा मतदारसंघात अंबरनाथ, ...