Friday 31 March 2023

पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) तर्फे चेंबूर येथील माहुल गाव म्युनिसिपल मराठी शाळेतील मुलांसाठी विनामूल्य वैद्यकीय चिकित्सा शिबिर संपन्न !

पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) तर्फे चेंबूर येथील  माहुल गाव म्युनिसिपल मराठी शाळेतील मुलांसाठी विनामूल्य वैद्यकीय चिकित्सा शिबिर संपन्न !

मुंबई, (शांताराम गुडेकर) : 

संपूर्ण महाराष्ट्र व आदिवासी पाड्यात आपल्या समाजकार्याचे जाळे विणणाऱ्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) यांच्या माध्यमातून नुकतेच माहुल गाव म्युनिसिपल मराठी शाळा चेंबूर येथील मुलांसाठी विनामूल्य वैद्यकीय चिकित्सा शिबिर पार पडले. यावेळी त्यांना स्वच्छता किट तसेच औषधे, खाऊचे वाटप करण्यात आले. 

याप्रसंगी विचारमंचावर राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझरचे वित्त संचालक श्रीमती नजहत शेख मॅडम, कार्यकारी संचालक श्री. अनिलकुमार माथुर, वरिष्ठ प्रबंधक श्री. अश्विन कांबळे, पंचरत्न मित्र मंडळ अध्यक्ष अशोक भोईर, सचिव प्रदिप गावंड तसेच डॉ.विनित गायकवाड, डॉ.रजनिश कुमार आदि मान्यवर  उपस्थित होते. 

यावेळी मार्गदर्शनपर भाषणात शाळकरी मुलांना शिस्त, आरोग्य पालनाचे महत्व समजावून सांगितले व अभ्यासावर लक्ष केंद्रीत करुन शाळेचे समाजाचे, देशाचे नाव उंचावण्याचा सल्ला दिला. प्रमुख पाहुण्यानी विद्यार्थांशी हितगुज साधताना त्यांना व्यायाम, आहार-विहार हेही आपल्या जीवनात तेवढेच महत्त्वाचे असून एक दिवस तुम्हीही विचार मंचावरून आपापले मनोगत मांडण्याइतके मोठे व्हा अशा शुभेच्छा दिल्या. 

यावेळी पंचरत्न मित्र मंडळाच्या सामाजिक कामाची प्रशंसा केली व आरसीएफचे  व्यवस्थापन आणि या मंडळाला मदत करणारे सर्वच प्रायोजक, दानशुर दाते हे नेहमीच पूर्ण ताकदीनिशी सहकार्य करुन मोठे सामाजिक दायित्व निभावत असल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. कार्यक्रम सूत्रसंचालनाची भुमिका सौ. स्नेहा नानिवडेकर यांनी पार पाडली. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रमेश पाटील, सचिन साळुंखे, वैभव घरत, हनुमंत चव्हाण, रहीम शेख, राजलक्ष्मी नायडू, नीलम  गावंड, स्वाती नाईक, जालिंदर इंगोले, मॅथ्यू  डिसूजा, सतीश कुंभार, प्रशांत नागपुरे, कार्तिकीयन एम. यांच्यासह पंचरत्न च्या सर्व पदाधिकारी, सभासद आणि सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. शेवटी मंडळ अध्यक्ष अशोक भोईर यांनी आभार व्यक्त करत कार्यक्रमची सांगता केली.

No comments:

Post a Comment

मतदारसंघांतील गेल्या दहा वर्षातील महायुतीची विकासाची कामे जनतेपर्यंत पोहोचवा - श्रीकांत शिंदे

मतदारसंघांतील गेल्या दहा वर्षातील महायुतीची विकासाची कामे जनतेपर्यंत पोहोचवा - श्रीकांत शिंदे  डोंबिवली, सचिन बुटाला : कल्याण पू...