Saturday, 29 April 2023

कल्याण-मुरबाड महामार्गावरील म्हारळपाडा ते पाचवामैल या दरम्यान सिंमेट काँक्रीट रस्त्याच्या कामात दिरंगाई, परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी !

कल्याण-मुरबाड महामार्गावरील म्हारळपाडा ते पाचवामैल या दरम्यान सिंमेट काँक्रीट रस्त्याच्या कामात दिरंगाई, परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी !

"जनतेच्या मनात संताप, निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना शिकविणार धडा"

कल्याण (संजय कांबळे) : कल्याण मुरबाड महामार्गावर म्हारळपाडा ते पाचवामैल या दरम्यान सिंमेट काँक्रीटच्या रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे. परंतु आता कांबा गावाच्या हद्दीत मेरिडियन शाळा व टाटा पावर हाऊस येथे मो-याचे काम सुरू असल्याने व येथे अरुंद रस्ता असल्याने या परिसरात तूफान वाहतूक कोंडी झाली आहे, विशेष म्हणजे भर ऊन्हात वाहने जागोजागी थांबली असल्याने वाहनचालक व प्रवासी यांच्या घामाच्या धारा वाहताना दिसत होत्या, मात्र याचे सोयरसुतक ठेकेदार, अधिकारी, वाहतूक पोलीस अथवा लोकप्रतिनिधी यांना कोणालाही नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

कल्याण मुरबाड महामार्गावर म्हारळपाडा ते पाचवामैल या ३/४ किलोमीटर अंतराचे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे काम सुरू आहे.गेल्या कित्येक महिन्यापासून हे काम धिम्या गतीने सुरू आहे. त्यापासून धुळ, चिखल, माती, खड्डे, याचा येथील नागरिकांना खूप त्रास झाला आहे. आतापर्यंत या मार्गावर अनेक अपघात झाले असून यामध्ये काहींचा जीव गेला तर कित्येक जण जखमी झाले आहेत.
वरप येथील सेक्रेट हार्ट स्कुल चे व्यवस्थापक अलबिंन सर  यांनी परिसरातील ग्रामस्थांना एकत्र करून या विरोधात तीव्र लढा उभारला होता, त्याचा परिणाम म्हणून मागील ठेकेदाराला हटवून दुसऱ्या ठेकेदारच्या मदतीने वरप पर्यत चार लेन पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु येथून पुढे टाटा पाँवर हाऊस, मेरिडियन शाळा, कांबा बस स्टाँप, सीएनजी पंंप पर्यंत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे, धूळ, अंरुद रस्ता अशा गैरसोय असून यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. कडक ऊन्हात वाहने जागोजागी थांबल्याने वाहनचालक, प्रवासी, यांच्या अगांची लाहीलाही होऊन घामांच्या धारा वाहत आहेत. 

याचा त्रास सर्वानाच होत असताना, येथे ना ठेकेदार, ना नँशनल हायवे अँथोरटी चे अधिकारी, ना कोणी वाहतूक पोलीस, ना या भागाशी संबधित लोकप्रतिनिधी असे कोणीही यावर उपाययोजना करण्याची तसदी घेताना दिसत नाही. गेल्या कित्येक महिन्यापासून या रस्त्यावरील केवळ  ५०० ते १००० मीटर कामासाठी परिसरातील कांबा, वरप, म्हारळ, येथील ग्रामस्थांसह कल्याण, मुरबाड, तालुक्यातील नागरिकांना याचा त्रास झाला आहे. त्यामुळे लोकामध्ये येथील लोकप्रतिनिधी विरोधात कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. या बाबतीत एका सामाजिक कार्यकर्त्याला विचार ले असता ते म्हणाले, लोकांच्या मनात सत्ताधा-यांच्या विरोधात खूप संताप आहे, म्हणून तर बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपा शिंदे गटाचा सुफडा साफ झाला, आता ते लोकसभा व विधानसभा निवडणुकीची वाट पहात आहेत.

No comments:

Post a Comment

रिपोर्ट: सपोनि विनोद पाटील नेम. म.फुले चौक पोलीस स्टेशन कल्याण प. यांच्याकडुन विषय म.फुले चौक पो.स्टे. कल्याण येचील बेवारस वाहनांची माहीती व...