Saturday 29 April 2023

यावल तालूक्याती पाडळसा, बामणोद, पिळोदा, म्हैसवाडी शिवारात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केली पाहणी...

यावल तालूक्याती पाडळसा, बामणोद, पिळोदा, म्हैसवाडी शिवारात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केली पाहणी...

यावल, अखलाख देशमुख, दि ३० : दि.२८ एप्रिल २०२३ रोजी जळगांव जिल्ह्यात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची यावल तालुक्यातील पाडळसा, बामणोद, पिळोदा व म्हैसवाडी शिवारात येथे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली, तसेच तत्काळ पंचनामे करण्याच्या संबंधितांना सूचना केल्या. 

अवकाळी पाऊस व जोरदार वादळामुळे यावल तालुक्यातील उभ्या पिकांचे तसेच राहत्या घरांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होऊन शेतकऱ्यांचे व रहिवास्यांचे कंबरडे मोडले गेले असून, त्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी आपल्या परीने पुरुपूर प्रयत्न करणार असल्याबाबत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना आश्वासन देऊन धिर दिला. यावेळी मौजे पिळोदा (यावल) येथे आयोजित भागवत सप्ताह कार्यक्रमास सदिच्छा भेट देऊन, स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला.

यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यास नरेंद्र कोल्हे, भरत महाजन, चंद्रकांत तळेले, प्रशांत सरोदे, कमलाकर सरोदे, अजय पाटील, मयूर चौधरी, राजू पाटील, दिनकर भंगाळे, निलेश बऱ्हाटे, पराग बऱ्हाटे, अनंत फावडे, तलाठी टी.सी. बरेला, तलाठी सूर्यवंशी अप्पा, कृषी सहाय्यक आगीवाल, प्रशांत सरोदे, अशोक चौधरी, बाळू पाटील, प्रभाकर सरोदे, चंद्रकांत चौधरी, मयुर मधुकर चौधरी, प्रशांत चौधरी, जितेंद्र चौधरी, सुजित चौधरी, हिरालाल चौधरी, शरद पाटील, विलास तुळशीराम चौधरी, सुरेश पाटील, रवींद्र दत्तात्रेय चौधरी ई. उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघात माझा विजय निश्चित - भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) काल महाविकास आघाडीच्या मतदारसंघा...