मुंबई, (शांताराम गुडेकर) :
आंतरराष्ट्रीय मानव हक्क सेवा परिषद वआदर्श मुंबई वृत्तपत्राच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य संपादक डॉ. संजय भोईर व उपसंपादक नवनाथ कांबळे, सहसंपादक भालचंद्र पाटे - पूनम पाटगावे यांच्यातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय समाजकार्य करणाऱ्या आदर्शकांचा गौरव " भारतरत्न गौरव श्री पुरस्कार " प्रदान करून मुंबईत करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्रसिद्ध संपादक डॉ. सुकृतजी खांडेकर, ( संपादक प्रहार ), डॉ. पवन अग्रवाल आंतरराष्ट्रीय ( व्याख्याते ), उपेंद्र सावंत ( मा. नगरसेवक ), सुवर्णा करंजे (मा. नगरसेविका ) बाळासाहेब हांडे (पत्रकार ) श्री.अनिल पांगारे प्रसिद्ध समाज सेवक, पूजा दळवी, अशोक भोईर , वर्षा यादव,विनोद मोहीते , सचिन पाटगावे , सहिष्णूता कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमात उद्घाटक डॉ. सुकृतजी खांडेकर यांनी प्रिंट मिडीया व डिजीटल मिडीयाचे महत्व सांगून. आदर्श मुंबईचे मुख्य संपादक डॉ. संजय भोईर व संपूर्ण टीमचे कौतुक केले. स्वागताध्यक्ष डॉ.पवन अग्रवाल यांनी आदर्श मुंबईचा आजवरचा प्रवास मांडला. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यक्रमाचे विशेष सत्कारमूर्ती डॉ. श्रीकांत बाभुळगावकर व बाळासाहेब हांडे यांच्या सामाजिक / वैद्यकीय कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमात श्री. दिपक फणसळकर -पूणे, सौ. पूनम पाटगावे - कोल्हापूर, अमित मोहिते - पूणे, सौ. मीरा पाटील - नवी मुंबई यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच सांगली, सोलापूर, बीड, यवतमाळ, नाशिक, पूणे, ठाणे, मुंबई इ. ठिकाणांहून आलेल्या पुरस्कार विजेत्यांना गौरवण्यात आले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी, डॉ. श्रीपाल कांबळे, गौतम एन. डांगळे, सतीश पांडे यांनी परिश्रम घेतले. शैक्षणिक व सामाजिक तसेच इतर क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करीत असलेले, कोकण सुपुत्र सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर महाराष्ट्र, महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष रत्नागिरी जिल्ह्यातील, लांजा तालुक्यातील, धुधंरे गावचे सुपुत्र दिपकजी शंकर फणसळकर यांना "भारतरत्न गौरव श्री" पुरस्कार-२०२३ मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. यापूर्वीही फणसळकर यांना अनेक राज्यस्तरिय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो हा विचार मनात ठेवून दिपक फणसळकर सतत जमेल ते सामाजिक काम करण्यात अग्रेसर आहेत. फणसलकर यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरावर हार्दिक हार्दिक अभिनंदन होत असून अनेकांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment