Monday, 1 May 2023

भिवंडीतील वळ पाडा इमारत दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू, अखेर ४५ तासानंतर थांबविली शोध मोहीम, तहसील कार्यालय व स्थानिकांनी मानले आभार !

भिवंडीतील वळ पाडा  इमारत दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू, अखेर ४५ तासानंतर थांबविली शोध मोहीम, तहसील कार्यालय व स्थानिकांनी मानले आभार !

भिवंडी, दि,१, अरुण पाटील (कोपर) :
           भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथील वर्धमान कंपाउंड मधील तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी घडली. घटनास्थळी तिसऱ्या दिवशीही म्हणजे ४५ तास मदतकार्य सुरूच होते. आज सकाळच्या ७ वाजल्याच्या सुमारास दोन जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बचाव पथकाकडून काढण्यात आले. या दुर्घटनेत एकूण ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० जखमींवर उपाचार सुरु आहेत.
           सोमवारी  सकाळी नऊ वाजल्याच्या सुमारास स्थानिक पोलीस आणि तहसील प्रशास नाकडून परिसरातील किंवा दुर्घटना ग्रस्त इमारतीमधील कोणी रहिवाशी बेपत्ता आहे का? याची शहानिशा करून घटनास्थळचे मदतकार्य थांबविल्याचे जाहीर केले.
           ४५ तास अहोरात्र मदतकार्य पाहता, टीडीआरएफ आणि एनडीआरएफसह अग्निशमन दलाच्या जवानांचा भिवंडी तहसिलदार श्री.अधिक पाटील,निवासी नायब तहसीलदार श्री.विशाल इंदुलकर,पूर्णा तलाठी सजेचे तलाठी श्री.सुधाकर कामडी, व ईतर शासकीय कर्मचारी आणी  स्थानिक गावकऱ्यांनी छोटेखानी सत्कार करून त्यांचे आभार मानले.
         दुर्घटनेत मृत्यू झालेल्याची नावे : नवनाथ सावंत (वय - ४०) लक्ष्मीदेवी रवी म्हातो (वय - २६ ) श्रीमती .सोना मुकेश कोरी (वय - ४५ ) सुधाकर गवई ( वय - ३४) प्रवीण प्रमोद चौधरी (वय - २२) त्रिवेणी यादव (वय - ४०), दिनेश तिवारी (वय - ३७) अशोक मिश्रा (वय - २९) असे दुर्घटनेत मृत्यू झालेल्याची नावे आहेत.
          तर जखमिंची नावे, सोनाली परमेश्वर कांबळे (वय - २२), शिवकुमार परमेश्वर कांबळे (वय - अडीच वर्षे), मुख्तार रोशन मंसुरी (वय - २६), चींकु रवी महतो (वय - ३ वर्ष), प्रिन्स रवी महतो (वय - ५ वर्ष), विकासकुमार मुकेश रावल (वय - १८ वर्ष), उदयभान मुनीराम यादव (वय - २९), अनिता (वय - ३०), उज्वला कांबळे (वय - ३०, सुनिल पिसाळ (वय - ४२)
          इमारतीवर मोबाईल टॉवर उभारण्यात आला होता. ज्यामुळे इमारतीवर अतिरिक्त भार पडला होता. इमारतीच्या बांधकामात सुरक्षेची कोणतीही बाब बांधकाम विकासकाने लक्षात घेतलेली नसल्याने हि इमारत कोसळल्याचे तपासात पुढे येताच नारपोली पोलीस ठाण्यात इमारत मालक इंद्रपाल पाटील याच्या विरोधात भादवी कलम ३०४, (१), ३३७, ३२८, आणि ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला कालच अटक करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

रिपोर्ट: सपोनि विनोद पाटील नेम. म.फुले चौक पोलीस स्टेशन कल्याण प. यांच्याकडुन विषय म.फुले चौक पो.स्टे. कल्याण येचील बेवारस वाहनांची माहीती व...