Monday, 1 May 2023

शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी - पालकमंत्री संदिपान भूमरे

शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी - पालकमंत्री संदिपान भूमरे

• जलयुक्त शिवार योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात
• मराठवाड्यात खरीप पीक कर्ज वाटपामध्ये जिल्हा प्रथम क्रमांकावर
• शिवभोजनाचा 50 लाख गरजूंनी घेतला लाभ
• मनरेगा अंतर्गत मातोश्री ग्राम समृध्दी पानंद रस्ते योजना घोषित

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १ : शेतकरी आपल्या राज्याचा मुख्य कणा आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकास व कल्याणासाठी शासन विविध योजना राबवित आहे. सिंचनाचे प्रमाण वाढावे म्हणून राज्य सरकार पुरेशा उपाय योजना करीत आहे. पहिल्या टप्यात यशस्वी ठरलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्याप्रमाणे कार्यवाही सुरू झाली आहे. दुसऱ्सा टप्यासाठी  जिल्ह्यातील 119 गावांची निवड करण्यात आली आहे. आराखडा तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असून शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे पालकमंत्री संदिपान भूमरे यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री संदिपान भूमरे यांच्या हस्ते ‘देवगिरी मैदान’ पोलिस आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पार पडला. त्यावेळी शुभेच्छा संदेशपर भाषणात ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, पोलिस आयुक्त मनोज लोहिया, विक्रीकर सहआयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय, मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया,  उपस्थित होते. 

पालकमंत्री पुढे म्हणाले की, आजपासून बरोबर 63 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आता आपल्या राज्याला राज्यगीतही मिळाले आहे. याबाबतचा निर्णयही आपल्या सरकारने घेतला आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा- गर्जा महाराष्ट्र माझा’ हे कवी राजा बढेयांचे गीत आता राज्याचे गीत झाले आहे. शेतकरी आपल्या राज्याचा मुख्य कणा आहे. या शेतकऱ्यांच्या पाठिशी आमचे सरकार खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकास व कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज पुरवठा करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने आता ‘सततचापाऊस’ ही बाब सुद्धा नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केली आहे. एवढेच नव्हे, तर अतिवृष्टी, अवकाळी पावसाचा फटका आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही बसला आहे. अशा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाने वेळो वेळी तातडीने मदत जाहीर केली आहे.जिल्ह्यातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा या करिता 15 एप्रिल ते 15 जून 2023 दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात ‘शासकीय योजनांची जत्रा’हा अभिन व उपक्रम राबविण्यात येत आहे.  या माध्यमातून जिल्ह्यातील 75 हजार नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत राज्याचा मागील वर्षाचा खर्च रुपये 2400 कोटी होता.  तो यावर्षी 3400 कोटी करण्यात आलेला आहे. या अंतर्गत 21 लाख मजूर कुटुंबांना अकुशल स्वरूपाचे काम दिले आहे. योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी वेग वेगळे लोकाभिमुख निर्णय घोषित केले आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने विहिरींची संख्या, अंतराची अट, भुजल प्रमाणपत्र रद्द केले आहे. वृक्ष लागवडी अंतर्गत मोहोगणी, मिलीया डुबिया सारखी वृक्ष लागवड व जवळपास 70 प्रकारचे वृक्ष लागवड, वन औषधी व ड्रॅगनफ्रुट, केळी, द्राक्षतसेच फुल पिके देखील योजनेतून घेण्यात येत आहे. मनरेगाअंतर्गत मातोश्री ग्राम समृद्धी पानंद रस्ते योजना घोषित केली असून 1 किलो मीटर कामासाठी रुपये 24 लक्ष अनुदान देण्यात येते. राज्यामध्ये जवळपास 38 हजार किलो मीटर रस्ते मंजूर केलेले असून त्यापैकी आपल्या जिल्ह्यामध्ये 4000 किलो मीटर रस्ते मंजूर केले आहे. जेकी राज्यामध्ये सर्वाधिक आहेत. जिल्ह्याचा मागच्या वर्षीचा खर्च 99 कोटी रुपये होता. तो या वर्षी 170 कोटी झालेला आहे.राज्यात खर्चानुसार आपल्या जिल्हाचा 5 वा क्रमांक आहे.वृक्ष लागवडी मध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आलेली असून राज्यामध्ये देखील आपला जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. गुरांचे गोठे देखील मोठ्या प्रमाणात मंजूर करण्यात आलेले असून राज्यात आपल्या जिल्ह्यात सर्वाधिक गुरांचे गोठे मंजूर केले असल्याचेही यावेळी ते म्हणाले. 
 
भाषणातील महत्वाचे मुद्दे:
• खरीप पीक कर्ज वाटपामध्ये जिल्हा मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर
• खरीप हंमागा मध्ये शेतकरी बांधवांना 1 हजार 300 कोटी रुपये पीक कर्जाचे वाटप 
• महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 2 लाख 40 हजार लाभार्थ्यांना 994 कोटीरकमेचा कर्ज मुक्तीचा लाभ
• प्रोत्साहनपर योजनेअंतर्गत 26 हजार शेतकरी लाभार्थ्यांना 80 कोटी इतक्या रकमेच्या कर्जमुक्तीचा लाभ
• नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये जिल्हा सुरुवातीपासून राज्यामध्ये प्रथमस्थानी
• प्रकल्पामधून 1 लाख 13 हजार शेतकऱ्यांना 734 कोटी रुपयांचे अनुदान वाटप
• खरीप हंगामामध्ये 1 लाख 91 हजार सभासदांना 1 हजार 330 कोटी तर रब्बी हंगामामध्ये 64 हजार सभासदांना 623 कोटी रुपयांचे कर्ज वाटप
• गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत 175 प्रस्तावांना मंजूरी
• प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमध्ये आपला जिल्हा देशात प्रथम क्रमांकावर-927 उद्योजकांना कर्जाचे वाटप 
• 75 वर्षांवरील 36 लाख एवढ्या नागरिकांनी योजनेचा लाभ घेतला
• महिलांना प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत- 14 लाख 30 हजार महिलांनी घेतला लाभ
• दिवाळीनंतर गुढी पाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 100 रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात अंदाजे 10 लाख 60 हजार किटचे वाटप 
• प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना व राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना मिळून 1 लाख 20 हजार मेट्रीक टन मोफत धान्य वितरीत
• सरासरी दरमहा 22 लाख 40 हजार लाभार्थ्यांना मोफत धान्याचा लाभ
• शिवभोजन-एकूण 61 शिव भोजन केंद्रांमधून दैनदिन 7 हजार शिव भोजन थाळी वाटप
• आज पर्यंत 50 लाख गरजूंनी घेतला योजनेचा लाभ
• जिल्ह्यातील 25 तृतीय पंथीयांना रेशन कार्ड आणि 47 तृतीय पंथीयांना ओळखपत्राचे वाटप
• कै. गोपिनाथराव मुंडे ऊस तोड कामगार कल्याण महामंडळांतर्गत 1 हजार 500 कामगारांना ओळखपत्र 

पालकमंत्री यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण- 

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण् आणि विहीत विभागाच्या 17 उमेदावारास नियुक्ती आदेश वितरण करण्यात आले. तसेच पोलिस दलामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले. यामध्ये उमाजी पवार, कारागृह उपमहानिरीक्षक, मनिष कलवानिया, पोलिस अधिक्षक, जयदत्त भवर, पोलिस उप अधीक्षक, मच्छिंद्र सुरवसे, पोलिस निरीक्षक संजय लोहकरे, पोलिस निरीक्षक,रामेश्वर रेंगे, , पोलिस निरीक्षक,अतुल वाळेक, , पोलिस निरीक्षक, गणेश नलावडे , पोलिस निरीक्षक,रोहित गांगुर्डे, देविदास शेवाळे, शिवाजी घोरपडे, अमोल सोनवणे, अशोक अवचार, इ. समावेश होता.

• राजेश चिंतामण भोसले पाटील- छत्रपती शिवाजी  महाराजवन श्रीपुरस्कार 2018
• शिवाजी नाग नाथराव राऊत- छत्रपती शिवाजी महाराजवन श्रीपुरस्कार 2019
• शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कन्नड- शैक्षणिक संस्था विभागस्तर 2018
• वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन फाऊंडेशन तिसगाव-  सेवा भावी संस्था विभागस्तर 2018
• जय विश्व कर्मा सर्वोदय संस्था बीड बायपास रोड –सेवाभावी संस्था विभागस्तर 2019
• दिपक एरंडे- तलाठी यांना सन्मान पत्र व रोख रक्कम देण्यात आली.

No comments:

Post a Comment

रिपोर्ट: सपोनि विनोद पाटील नेम. म.फुले चौक पोलीस स्टेशन कल्याण प. यांच्याकडुन विषय म.फुले चौक पो.स्टे. कल्याण येचील बेवारस वाहनांची माहीती व...